अंबाजोगाई : जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपात न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांना अखेर आज जामीन मिळाला. पंचवीस हजार रुपयांचा जात मुचलका आणि काही अटींवर हा जामीन देण्यात आला आहे.
करुणा शर्मा यांना ६ सप्टेंबर रोजी एक दिवसांची पोलिस कोठडी आणि त्यांनतर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज पंधरा दिवसांनी करूणा शर्मा तुरूंगातून बाहेर आल्या. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोप करत करुणा शर्मा यांनी परळीत पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला होता.
परळीत दाखल झाल्यानंतर त्यांची वैद्यनाथ मंदीर परिसरात काही महिलांशी वादावादी झाली होती. संबंधित महिलेच्या तक्रारीवरून करुणा शर्मा यांच्यावर मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात करुणा शर्मा यांच्या गाडीचा चालक याच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली असता त्यांना जामीन देण्यात आला. जामीन देतांनाच दोषारोपपत्र पत्र दाखल होईपर्यंत त्यांना परळी व अंबाजोगाई तालुक्यात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अपर जिल्हा
सत्र न्यायाधीश एस. एस. सापत्नेकर यांनी हा जमीन मंजुर केला. ६ सप्टेंबरपासून शर्मा या न्यायालयीन कोठडीत होत्या. त्यांनी वकिलांमार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
मंगळवारी न्यायाधीश सापतनेकर यांच्या न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले. यावेळी सरकारी पक्षाच्या बाजूने ॲड. अशोक कुलकर्णी तर करुणा शर्मा यांच्या वतीने ॲड. जयंत भारजकर यांनी बाजू मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.