आडसकर माजलगावच्या मैदानात उतरले आणि बाबुरावांचा 'हाबाडा' शब्द पुन्हा घुमू लागला

दिवंगत लोकनेते बाबूराव आडसकर यांनी दिवंगत जेष्ठ समाजवादी नेते बापूसाहेब काळदाते यांचा पराभव केला होता. तेव्हा माध्यमांना त्यांनी 'हाबाडा दिला' अशी प्रतिक्रीया दिली होती.
Baburao Adaskar - Ramesh Adaskar.
Baburao Adaskar - Ramesh Adaskar.
Published on
Updated on

माजलगाव : रांगडेपणा, समोरच्यावर तुटून पडले, सामान्यांत मिसळणे आणि कामाच्या विषयाचा जागेवरच तुकडा पाडणे ही दिवंगत लोकनेते बाबूराव आडसकर यांचे गुण त्यांचे पुत्र रमेश आडसकर यांच्याही अंगी आहेत. रमेश आडसकर आता भाजपकडून माजलगावच्या मैदानात उतरल्यानंतर बाबुराव आडसकर यांच्यामुळे राजकीय प्रतिष्ठा मिळालेला 'हाबाडा' शब्द पुन्हा घुमू लागला आहे.

दिवंगत लोकनेते बाबूराव आडसकर यांनी दिवंगत जेष्ठ समाजवादी नेते बापूसाहेब काळदाते यांचा पराभव केला. त्याकाळी राज्यात या निकालाची चर्चा झाली. मुंबईत माध्यम प्रतिनिधींनी बाबुराव आडसकर यांनी 'दिला हाबाडा' अशी प्रतिक्रीया दिली आणि अस्सल ग्रामीण शब्द राज्याच्या राजकीय शब्दकोषात लिहला गेला. आता त्यांचे पुत्र रमेश आडसकर यांच्यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विश्वास दाखवत माजलगावमधून भाजपची उमेदवारी दिली आहे. तसे, आडसकर वर्षापासून येथे तयारी करत आहेत. रमेश आडसकर यांच्या वागण्या - बोलण्यातला साधेपणा, सामान्यांत मिसळण्याची, समजून घेण्याची आणि एखाद्या विषयाचा जागेवरच 'हो - नाही' मध्ये तुकडा पाडण्याची शैली वडिल बाबूराव आडसकर यांच्या प्रमाणेच आहे. 

विरोधकांवर टिकेऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्यांच्या हिताच्या राबविलेल्या योजना आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या विकास कामांचाच उहापोह आडसकर करतात. झोपडी असो कि साधे घर, शेतातला बांध असो किंवा झाडाखाली टाकलेली खाट तिथे बसताना त्यांनी कधी आडेवेडे घेतले नाहीत. त्यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच मतदार संघातील प्रत्येक गावांचा दौराही पूर्ण केला. त्यांनी उमेदवारी भरतानाही जोरदार शक्तीप्रदर्शन केले आणि सर्वांनाच एकत्र आणले. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनीही हजेरी लावली. त्यांचे समर्थकही आता 'हाबाडा' देणारच असा विश्वास व्यक्त करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com