रात्री उशीरापर्यंत बैठका, तरीही जयंतरावांनी माॅर्निंग वाॅकचा नियम मोडला नाही..

(Jayant Patil)मंत्री पदाची जबाबदारी आणि पक्ष वाढीचे लक्ष्य असे दुहेरी ( Ncp State President)आव्हान पेलतांना जयंत पाटील आपण ठणठणीत कसे राहू याकडेही लक्ष देतात.
Ncp State President Jayant Patil
Ncp State President Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

परभणी ः पक्ष वाढीसाठीच्या जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज पहाटेच परभणीच्या रस्त्यावर फिरतांना दिसले. पहाटे उठून व्यायाम आणि फिरायला जाण्याचा शिरस्ता त्यांनी दौऱ्यावरही कायम ठेवला. रात्री उशीरापर्यंत पक्षाच्या बैठका, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि त्यानंतर जेवण. यामुळे रात्रीचा एक वाजून गेला, त्यामुळे साहेब लवकर उठणार नाहीत, असेच अनेकांना वाटले.

पण जयंत पाटलांनी `करेक्ट` सहाचा घड्याळातील गजर वाजल्यानंतर उठून नियमित व्यायामाला बाहेर पडणे पसंत केले. कानाला हेडफोन लावून ते परभणीच्या रस्त्यावर फिरायला निघाले आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. राजकारणातील अनेक नेते हे आपल्या व्यस्थ वेळापत्रकातून वेळ काढून आरोग्याकडे लक्ष देतात.

सकस आहार, योग, साधना, नियमित व्यायाम या जोरावर ते राजकारणातील आपला फिटनेस सांभाळून आहे. राज्यातील अनेक पक्षातील नेत्यांची यात नावे घेता येतील. यातीलच एक म्हणजे जयंत पाटील. राजकारणात सध्या जयंत पाटील यांच्या करेक्ट कार्यक्रमाची चर्चा चांगलीच रंगते आहे. पण त्याचा हा करेक्ट टायमिंग फक्त राजकाराणातील डावपेचासाठीच असतो असे नाही, तर स्वतःचे स्वास्थ, आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी देखील तो ते साधतात.

मंत्री पदाची जबाबदारी आणि पक्ष वाढीचे लक्ष्य असे दुहेरी आव्हान पेलता जयंत पाटील आपण ठणठणीत कसे राहू याकडेही लक्ष देतात. पक्षाच्या कार्यक्रमानिमित्य परभणीत आलेल्या जयंत पाटील यांनी आपल्या दैनंदिन कार्यक्रमात कुठलाही खंड पडू दिला नाही. पक्षाच्या बैठका, पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि त्यांनतर जेवण यामुळे रात्री उशीरा एकपर्यंत जयंत पाटलांना जागावे लागले.

त्यामुळे सहाजिकच ते सकाळी उशीरा उठतील असा सगळ्यांचा अंदाज होता. पण राजकारणात अनेकांचे अंदाज चुकवत करेक्ट कार्यक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या जयंत पाटलांनी परभणीतही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे अंदाज चुकवले. पहाटेच कानात हेडफोन घालून ते बाहेर पडले आणि दोन-तीन किलोमीटरची पायपीट करून आले.

Ncp State President Jayant Patil
चंद्रकांतदादांची क्षमता पैशात मोजू नका, त्यांनी १०५ आमदार निवडून आणलेत..

राज्यात कुठेही दौऱ्यावर असो, रात्री कितीही उशीर होवो, पण सकाळी उठून फिरायला जाणे आपण कधीच चूकवत नाही, असे जंयत पाटील अभिमानाने सांगतात. जंयत पाटलांच्या या माॅर्निग वाॅकची सध्या परभणीत चांगलीच चर्चा रंगली आहेय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com