औरंगाबाद : महाराष्ट्र दिनी (१ मे) औरंगाबाद येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची सभा होत आहे. या सभेसाठी राज ठाकरे आज पुण्याहून नाशिककडे रवाना होणार आहेत. पोलिसांनी काही अटीशर्तींवर राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली. मनसेकडून सभास्थळी तयारी पूर्ण झाली आहे. राज ठाकरे यांना औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील (imtiyaj jaleel) यांनी इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात 3 मे ची डेडलाईन महाविकास आघाडी सरकारला दिली आहे.तीन तारखेला राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. इम्तियाज जलील यांनी आज औरंगाबाद पोलीस आयुक्तांची भेट घेत आगामी काळात शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यास पूर्णपणे सहकार्य करु असं सांगितलं आहे.
इम्तियाज जलील म्हणाले, "सभेत भाषणासाठी उभे राहिले असताना राज ठाकरे काहीही बोलू शकतात पण आम्ही शत्रू नक्कीच नाही. मग आमचा पक्ष आणि आमची विचारसरणी भलेही वेगळी का असेना.माझा धर्म, माझी संस्कृती आणि मला लहानपणापासून मिळालेली शिकवण हेच सांगते की राज ठाकरे आमचे पाहुणे आहेत. ते आमच्या शहरात आले आहेत, त्यामुळे सभेला जाण्याआधी मी त्यांना इफ्तार पार्टीसाठी निमंत्रीत केलं आहे,"
राज ठाकरेंनी ईदच्या दिवशी भेटीसाठी यावं असं निमंत्रण इम्तियाज जलील यांनी केलं आहे. पण जलील यांच्या या आमंत्रणाबाबत राज ठाकरे किंवा मनसेकडून कुठलीही प्रतिक्रिया अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही.इम्तियाज जलील यांच्या इफ्तार पार्टीचं निमंत्रण राज ठाकरे स्वीकारतील का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहेत.
राज ठाकरे उद्या अर्थात महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत, औरंगाबादला जाण्यासाठी ते कार्यकर्त्यांसह पुण्यातून निघाले आहेत. औरंगाबादला रवाना होण्याआधी पुण्यात त्यांच्या राजमहाल या निवासस्थानी गुरुजींच्या माध्यमातून मंत्रोच्चारासह आशीर्वाद असा धार्मिक कार्यक्रम झाला. त्यासाठी मनसेने पोस्टरही छापलं होतं. यावर हिंदूजननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे. यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी शेकडो गुरूजन, असा मजकूर छापण्यात आला आहे. पुण्यातून निघाल्यानंतर वढू तुळापूर इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे,त्यानंतर नगरमार्गे ते औरंगाबादला जाणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.