

परभणी : परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले नाही तर, राजकारणातून सन्यास घेईन, असे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी रविवारी (ता.9) स्पष्ट केले. एका खासगी सत्कार कार्यक्रमात खासदार संजय जाधव यांनी परभणी केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन मोठे युनिट उभे करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.
येथील प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. संजय टाकळकर व मित्र परिवाराच्यावतीने खासदार संजय जाधव यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन धर्मापूरी (ता.परभणी) येथील श्रीराम बाग अॅग्रो टुरीझम येथे रविवारी (ता.9) केले होते. कार्यक्रमास जेष्ठ विधिज्ञ अशोक सोनी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम, भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे, विश्व हिंदू परिषदेचे संजय शेळके, नगरसेवक मधुकर गव्हाणे, विजय ठाकूर, आयोजक डॉ. संजय टाकळकर, धर्मापूरीचे उपसरपंच धाराजी उगले, ग्रामपंचायत सदस्य नामदेव कदम, तानाजी कदम, तंटामुक्ती समितीचे राजकरण कदम यांची उपस्थिती होती.
यावेळी अॅड. अशोक सोनी यांनी खासदार संजय जाधव यांनी परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी जनआंदोलन उभारले होते. त्यामुळे या ठिकाणी या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी समितीद्वारे तपासणी देखील करण्यात आली. आता केवळ मंजूरीची प्रतिक्षा आहे. परभणी जिल्ह्यातील नागरीकांनी खासदार जाधव यांना भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे आता श्री. जाधव यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आपले वजन वापरावे अशी विनंती केली. या विनंतीचा धागा पकडत खासदार संजय जाधव यांनी आपण पहिल्यापासूनच परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी आग्रही आहोत असे सांगत आगामी काळात निश्चितपणे या महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी आपण प्रयत्न करणार आहोत. इतकेच काय तर परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही झाले तर आपण राजकारण सोडून देऊ असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याच बरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण अजून एखादे मोठे युनिट परभणी येथे आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपण पंतप्रधानांची देखील भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.