पंकजा मुंडे आणि  सुरेश धस  यांची साहित्य संमेलनात  बॅटिंग 

रजनी पाटील खासदार, संगीता ठोंबरे आमदार, सविता गोल्हार जिल्हा परिषद अध्यक्षा, रचना मोदी नगराध्यक्षा, उषा दराडे माजी आमदार अन् मी स्वत: कॅबिनेट मंत्री आहे असे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.
Rajani Patil Sangita Thombre  Pankaja Munde
Rajani Patil Sangita Thombre Pankaja Munde

बीड : जिल्ह्याच्या राजकारणात महिलांचा कायम दबदबा राहिलेला आहे. महिला पुरुषांपेक्षा काकणभर सरस असल्याची आठवण ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी करुन दिली ती देखील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन.

महिलांची संख्या नव्हे तर शक्ती मोजा अशी कोटी  पंकजा मुंडे यांनी माजी मंत्री सुरेश धस यांना उद्देशून केली असली केली असली तरी आपल्या विरोधकांना आपल्या ताकदीची आठवण त्यांनी करून दिली. 

अंबाजोगाई येथे २४, २५ डिसेंबर रोजी  ३९ वे मराठवाडा साहित्य संमेलन पार पडले. रविवारी   संमेलनाचे उदघाटन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. कोट्या, कोपरखळ्या व हास्याचे कारंजे आणि कधी भावूक असे वातावरण उदघाटनात होते.

 माजी मंत्री सुरेश धस यांनी व्यासपीठावर पहिल्या रांगेत पुरुषांच्या बरोबरीने महिलांची संख्या असल्याकडे लक्ष वेधले. हा धागा पकडून मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘महिलांची संख्या मोजू नका तर त्यांची शक्ती मोजा’ असा सल्ला दिला. 

रजनी पाटील खासदार, संगीता ठोंबरे आमदार, सविता गोल्हार जिल्हा परिषद अध्यक्षा, रचना मोदी नगराध्यक्षा, उषा दराडे माजी आमदार अन् मी स्वत: कॅबिनेट मंत्री आहे असे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. 

सुरेश धस हे भाजपच्या वाटेवर आहेत; परंतु सहा महिन्यांपासून त्यांचा प्रवेश खोळंबलेला आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा व धस यांच्यात रंगलेल्या या कोट्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

सुरेश धस यांनी आपण पहिल्यांदाच साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आल्याचे सांगितले, त्याचा संदर्भ देत पंकजा यांनी त्यांना ‘राजेसाहेब देशमुख जि.प. मध्ये भाजपसोबत राहिले, त्यामुळे त्यांनी साहित्य संमेलन घेतले. 

आमच्यासोबत असणारे चांगलीच कामे करतात. आता तुम्ही पहिल्यांदाच साहित्य संमेलनात आला आहात; पण भविष्यात पुस्तक देखील लिहिताल’ असे सांगितले. त्यामुळे उपस्थितांत पुन्हा हास्यकल्लोळ निर्माण झाला.

संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी यांनी आपल्या भाषणात दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि दिवंगत प्रमोद महाजन यांची आठवण काढल्यानंतर पंकजा मुंडे भावूक झाल्या. मुंडे आणि महाजन दोघेही तिवारींचे विद्यार्थी होते. 

गोपीनाथ मुंडे खरे 'नाथ' आणि लोकांचे लोकनेता होते. प्रमोद महाजन आणि रेखा महाजन यांनी 'खेळ सावल्यांचा' या नाटकात अभिनय केला तेथूनच ते एकत्र आल्याचे सांगून संसदेतील भाषणात त्यांना एखादा शेर म्हणायचा असेल तर फोन करून विचारत अशी आठवण तिवारींनी सांगितली.

 पंकजा संघर्षाने  झाल्याची शाबासकी तिवारींनी दिली. यावेळी पंकजा मुंडे धीरगंभीर आणि भावूक झाल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com