

Ganeshotsav DJ Rules : राज्यभरात डीजेबंदीचा आवाज आहे, पुण्यासह संपूर्ण राज्यात यंदाचा गणेशोत्सव हा डीजे मुक्त साजरा व्हावा, यासाठी सर्वसामान्य नागरीकांसह राज्य सरकारही पुढाकार घेत आहे. तीन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे पालकमंत्री संजय शिरसाट व पोलीस आयुक्तालयाच्या पुढाकाराने शांतता समितीची बैठक झाली.
यावेळी डीजेबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करा, कोणाचीही गय करू नका, असे स्पष्ट आदेश पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलीसांना दिले होते. यंदा डीजेचा आवाज गणेशोत्सवात वाढणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर डीजे व्यवासायिक आणि त्यांच्या असोसिएशनने पोलीस आयुक्तांनाच घेराव घातला.
त्यानंतर आता अटी शर्तीवर पोलीसांनी डीजेचालकांना परवानगी दिली आहे. पोलीस आयुक्तालयात ११५ डीजे चालकांची बैठक झाली. यामध्ये दोन टॅाप आणि दोन बेस वापरण्याची अट आणि प्रात्यक्षिक बघितल्यावर पोलीसांनी परवानगी दिली आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या उपस्थितित ही बैठक पार पडली.
गणेशोत्सवाच्या काळात डीजे व स्पीकरचा वापर मर्यादेत आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करत करण्यावर चर्चा झाली. डीजेच्या सेटअप मध्ये दोन टॅाप आणि दोन बेसचाच वापर करावा, अशा सूचना पोलीसांच्या वतीने बैठकीत देण्यात आल्या. मिड साऊंड किंवा प्लाझ्मा स्पीकरचा वापर केला जाणार नाही, असे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकार स्पष्ट करण्यात आले आहे.
याच बैठकीत डिजे चालकांकडून प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. डिजे चालक-मालक व ऑपरेट यांनी ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेत गणेशोत्सव शांततेत, सुरक्षिततेत व उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.