बीड : दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे कट्टर समर्थक राहीलेली अनेक मंडळी पंकजा मुंडेंपासून दुरावलेले आहेत किंवा काहींना मुंडेंनीच दुर ठेवलेले आहे. अशाच बीडमधील नितीन कोटेचा यांची गुरुवारी आमदार सुरेश धस यांची भेट घेऊन चर्चा केली. यानिमित्ताने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी या दुरावलेल्या स्नेही - आप्तेष्टांना पुन्हा पंकजा मुंडे यांच्याशी जोडण्याचे प्रयत्न सुरेश धस यांनी सुरु केलेले दिसत आहेत .
इतर पक्षीय नेत्यांसह विविध क्षेत्र आणि समाजातील प्रमुखांशी असलेले सलोख्याचे संबंध हे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे बलस्थान होते. या जिवावरच पक्षाची सत्ता नसतानाही दिवंगत मुंडेंचा राजकीय दबदबा आणि रुबाब कायम राहीला. राजकारणात सक्रीय नसलेल्या मात्र समाजांमध्ये वजन आणि किंवा व्यवसायिक व्यक्तींशी दिवंगत मुंडेंचे कौटुंबिक संबंध राहीले. असेच नितीन कोटेचा यातील प्रमुख नाव आहे. बीडमध्ये आल्यानंतर दिवंगत मुंडेंची उठबस हमखास कोटेच्या यांच्याच घरी असे . दिवंगत मुंडेंच्या प्रमुख पत्रकार परिषदांसह अनेक इतर पक्षातील राजकीय नेत्यांचे प्रवेशही कोटेच्या यांच्याच घरात झाले.
अगदी दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांची मुंडेंना होणाऱ्या राजकीय मदतीची तडजोडही येथूनच होई. एकूणच अशा अशा राजकीय घटनांसह गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय आयुष्यातील चढउताराचे नितीन कोटेचा आणि त्यांचे घर साक्षीदार राहीले. गोपीनाथ मुंडेंचे साथीदार म्हणून कोटेचा यांचाही समाजात मान वाढला आणि त्यांनाही महत्वाची पदे भेटली. मात्र, मुंडेनंतर कोटेचा आणि पंकजा यांच्यात दुरावा निर्माण झाला . कोटेचा दुर गेले कि पंकजा मुंडेंनीच त्यांना दुर सारले असा प्रश्न आणि त्याबाबतची विविध कारणे कायम चर्चेत असतात.
मात्र, गुरुवारी एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बीडमध्ये आलेल्या सुरेश धस यांनी नितीन कोटेचा यांच्या घरी जाऊन चहापान घेतले आणि त्यांच्यासोबत चर्चाही केली. तशी ही खास भेट नसली तरी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी असे समाजघटक आणि व्यक्तींना जवळ करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलल्या जाते. दुरावलेल्या किंवा दुर सारलेल्या किती जणांना जवळ करण्यात यश येते हे लवकरच कळेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.