Buldhana Accident News: काळाचा घाला...! सिंदखेडराजा येथे ट्रक-एसटीचा भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू तर...

Sindkhedraja News : वेळेवर मदत न मिळाल्यानं काही जणांना जीव गमवावा लागला...
Sindkhedraja Accident
Sindkhedraja AccidentSarkarnama

Sindkhedraja Accident News: समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत असल्याची चर्चा जोर धरु झाली आहे. हा महामार्ग सुरू झाल्यापासून मागील चार महिन्यांत 253 रस्ते अपघात झाले आहेत. ज्यात 28 जणांना जीव गमवावा लागला आहे. याचदरम्यान, मुंबई नागपूर जुन्या महामार्गावर सिंदखेडराजा येथे ट्रक आणि एसटीच्या भीषण अपघातात आठ जण ठार झाले आहेत. तर १३ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

सिंदखेडराजा(Sindkhedraja) जवळ पळसखेड चमकत या गावाजवळ मंगळवारी(दि.२३) हा भीषण अपघात घडला. संभाजीनगरहून वाशिमकडे ही एसटी बस जात होती. याचवेळी भरधाव ट्रक आणि बसची धडक झाली. या अपघातात ८ जणांचा दुर्दैवी अंत झाला तर १३ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

Sindkhedraja Accident
Rahul Gandhi Truck Travel : 'भारत जोडो' नंतर राहुल गांधींची 'ट्रक यात्रा'; चक्कं दोन राज्याचा प्रवास ट्रकमधून..

काय घडलं ?

मुंबई-संभाजीनगर-नागपूरच्या जुन्या महामार्गाजवळ हा अपघात झाला. ही बस संभाजीनगरहून वाशिमच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी आज सकाळी ६.१५ च्या दरम्यान ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या अपघातात बसचा चालक जागीच ठार झाला आहे. अपघाताच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आहेत. तसंच मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.मात्र, वेळेवर मदत न मिळाल्यानं काही जणांना प्राण गमवावा लागला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनीनं दिली आहे. (Latest Marathi News)

अपघातांमागे पोलिसांचा 'हा' निष्कर्ष...

समृद्धी महामार्गा(Samruddhi Mahamarg)वर वाहन चालवतांना चालकांना डुलकी आणि थकव्यामूळे सर्वाधिक अपघात होत असल्याचा निष्कर्ष महामार्ग पोलिसांनी काढला आहे. याचवेळी गेल्या पाच महिन्यातील अपघाताच्या सर्वेक्षणानंतर डुलकी आणि थकव्यामूळे सर्वाधिक ९८ अपघात झाले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Sindkhedraja Accident
Jayant Patil meets Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग; ईडी'च्या चौकशीनंतर जयंत पाटील आज शरद पवारांना भेटणार...

महिला पोलीस अधिकाऱ्याचाही दुर्दैवी अंत

समृद्धी महामार्गावर नुकत्याचं झालेल्या अपघातात हरियाणाच्या महिला पोलीस निरीक्षक नेहा चौहान यांचा मृत्यू झाला. 29 एप्रिल रोजी त्यांची टीम मराठवाडा विभागातील परभणी येथून परत येत असताना त्यांचा मृत्यू झाला होता. वर्धा जिल्ह्यात ही दुर्घटना घडली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com