जायकवाडीच्या कालव्यांची वहन क्षमता वाढवणार; जलसंपदा मंत्र्यांचे आश्वासन..

(Minister Jayant Patil) जिल्ह्यातील प्रगतीपथावर (On Going Projects) असलेल्या प्रकल्पांची कामे लवकर पुर्ण करा
Minister Jayant Patil Aurangabad
Minister Jayant Patil AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी मिळणे आवश्यक आहे. शेतीला पाणी मिळण्यासाठी जिल्ह्यातील प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांची कामे लवकर पुर्ण करावेत, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

जयंत पाटील म्हणाले, जायकवाडी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याची दुरूस्ती करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. या कालव्यांची वहन क्षमता कमी झाल्याने या क्षेत्राचे संपूर्ण सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश दिले असून प्रस्ताव प्राप्त होताच पुढील कार्यवाहीसाठी सदरचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे पाठविण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व कालव्यांची वहन क्षमता वाढविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. जेणेकरुन सर्व प्रकल्पांचे पाणी शेवटच्या लाभार्थी शेतकऱ्याला मिळेल. जायकवाडीसह जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांच्या दुरूस्तीसाठी देखील सर्व्हेक्षण करुन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पाटील यांनी यावेळी दिल्या.

यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी तापी आणि गोदावरी महांमडळाची संयुक्त बैठक घेण्याची विनंती केली.यावर संयुक्त बैठक लवकरच घेण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. आमदार रमेश बोरनारे यांनी वैजापुर तालुक्यातील सेनी देवगांव उच्च बंधारा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या लवकरात लवकर देण्याची विनंती केली.

तसेच नारंगी-सारंगी धरणामध्ये पालखेड धरणाचे ओव्हर फ्लो होणारे पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करावे, शिवना टाकळी धरणाचे अनेक कामे अर्धवट आहेत ही कामे लवकर पुर्ण करावेत जेणेकरुन तालुक्यातला पाणी मिळेल, मण्यार धरणाची उंची वाढवावी अशीही विनंती पाटील यांना केली.

Minister Jayant Patil Aurangabad
राष्ट्रवादीच्या `परिवार संवाद` यात्रेत `विसंवाद`, जिल्हा कार्याध्यक्षाचा राजीनामा..

आमदार हरीभाऊ बागडे यांनी यावेळी फुलंब्री परिसरातील जल प्रकल्पाच्या क्षेत्रातील जमीन संपादनाबाबत असलेला अडथळा दुर करावा, जेणेकरुन हा प्रकल्प लवकर पुर्ण होईल अशी विनंती केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com