Narendra Dhabholkar Case : दाभोलकर निकालामुळे पानसरे, लंकेश, कलबुर्गी प्रकरणांची चर्चा; न्याय कधी मिळणार?

Narendra Dhabholkar Case Updates : लंकेश, पानसरे आणि कलबुर्गी यांच्याही हत्या प्रकरणात आता तपास लवकरात लवकर करण्यात येऊन, आरोपींना शिक्षा केली जावी, अशी भावना व्यक्त होत आहे.
Narendra Dhabholkar Case Updates
Narendra Dhabholkar Case UpdatesSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल अखेर 11 वर्षांनी निकाल लागला आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. या प्रकरणातील पाच पैकी तीन आरोपी निर्दोष सुटले आहेत. तावडे, पुनाळेकर आणि भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप आणि 5 लाख दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. तब्बल अकरा वर्षांनतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. आता दाभोलकर प्रकरण अनुषंगाने गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणाचीही चर्चा आता होत आहे. (Latest Marathi News)

दाभोलकर यांच्या हत्याप्रमाणेच लंकेश, पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली. या सर्व हत्यांच्या प्रकरणामध्ये समान धागा असल्याची वारंवार चर्चा झाली. या सर्वांच्या हत्या प्रकरणात समान कार्यपद्धती असल्याचे दिसून येत होते. आता दाभोलकर हत्या प्रकरणावर निकाल आल्याने लंकेश, पानसरे आणि कलबुर्गी यांच्याही हत्या प्रकरणात तपास लवकरात लवकर करण्यात यावा आणि मारेकऱ्यांना कठोर शिक्षा केली जावी, अशी भावना व्यक्त होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गौरी लंकेश यांची हत्या -

ज्येष्ठ पत्रकार आणि उजव्या विचारसरणीच्या समीक्षक गौरी लंकेश यांची बेंगळुरूमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 55 वर्षांच्या गौरी लंकेश या 'लंकेश पत्रिका' नावाचे नियतकालिक चालवत होत्या. त्यांचे वडिल पी लंकेश यांनी ही पत्रिका सुरू केली होती. या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी 'कम्युनल हार्मनी फोरम'चा मोठ्या प्रमाणात प्रचार केला. गौरी लंकेश यांनी लेखक आणि पत्रकार राणा अय्युब यांच्या 'गुजरात फाइल्स' या पुस्तकाचे कन्नडमध्ये भाषांतर केले होते.

गोविंद पानसरे यांची हत्या -

ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांची 16 फेब्रुवारी 2015 रोजी गोळी झाडून हत्या करण्यात आली. ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. कोल्हापुरातील त्यांच्या राहत्या घराजवळ दोन जणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या जीवघेण्या हल्ल्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचे वय 82 वर्षे होते. या हल्ल्यात त्यांच्या पत्नी उमा पानसरे याही गंभीर जखमी झाल्या आहेत.

Narendra Dhabholkar Case Updates
Narendra Dabholkar Case : मोठी बातमी! दाभोलकर हत्या प्रकरणातील अंदुरे, कळसकरला जन्मठेप

एम एम कलबुर्गी हत्या -

नऊ वर्षांपूर्वी ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली. याचा तपास सीबीआय अजूनही करत आहे. कर्नाटकातील (Karnataka) धारवाड येथील कलबुर्गी यांच्या घरी दोन तरुण मोटरसायकलवरून आले. एकाने त्याच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्याने स्वत:ला कलबुर्गीचा विद्यार्थी असल्याचे सांगितले. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. त्यानंतर कलबुर्गी यांना गोळ्या घालण्यात आल्या. आणि त्यानंतर मारेकरी मोटारसायकलवर थांबलेल्या मित्रासह तेथून पळून गेला. कलबुर्गी यांच्या निधनाने संपूर्ण देश हादरला होता.

Narendra Dhabholkar Case Updates
BJP News: भाजपने राऊतांना भरला दम; आपले 'प्रताप' बंद करा, अन्यथा तुमची शुर्पणखा करु...

निकाल कधी लागणार ?

दाभोलकर हत्या प्रकरणी 11 वर्षांनतर निकाल आला. या निकालात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप सुनवण्यात आली. याच अनुषंगाने आता गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणाचीही चर्चा आता होत आहे. न्यायासाठी किती प्रतीक्षा करायची यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा कधी होणार, अशी भावना आता समाजमनातून व्यक्त होताना दिसत आहे. (Crime News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com