अजूनही कर्नाटक सरकारवर येडियुरप्पांचाच शिक्का!

येडियुरप्पांवर पक्षाने अद्याप कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. असे असले तरी राज्य सरकावरील त्यांचा शिक्का कायम आहे.
Basavraj Bommai and B.S.Yediyurappa
Basavraj Bommai and B.S.Yediyurappa File Photo
Published on
Updated on

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) आले आहेत. येडियुरप्पांवर पक्षाने अद्याप कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. असे असले तरी राज्य सरकावरील त्यांचा शिक्का कायम आहे. येडियुरप्पांच्या निकटवर्तीय सहकाऱ्यांची आता सरकारमध्ये अतिशय महत्वाच्या पदांवर वर्णी लागली आहे.

आमदार एम.पी. रेणुकाचार्य आणि माजी आमदार डी.एन. जीवराज यांची मुख्यमंत्री बोम्मई यांच्या राजकीय सचिवपदी नियुक्ती झाली आहे. हे पद मंत्री समकक्ष असून, मंत्र्यांना मिळणार सर्व लाभ या सचिवांना मिळतात. येडियुरप्पा हे मुख्यमंत्री असताना हे दोघेही राजकीय सचिव होते. येडियुरप्पांच्या नंतर त्यांनीही राजीनामा दिला होता. नंतर पुन्हा नियुक्ती व्हावी, यासाठी दोघांनी बोम्मई यांच्यावर दबाव आणला होता. अखेर येडियुरप्पांनी शब्द टाकल्यानंतर या नियुक्त्या झाल्या आहेत. या दोघांच्या नियुक्तीमुळे येडियुरप्पा हे सरकारमधील बारीकसारीक गोष्टींवरही लक्ष ठेवू शकणार आहेत.

बोम्मई हे मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी रेणुकाचार्य हे आग्रही होते. त्यांनी याबाबत जाहीरपणे इच्छा व्यक्त केली होती. परंतु, त्यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. आता राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता नाही. यामुळे त्यांची अखेर मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या पदी वर्णी लागली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Basavraj Bommai and B.S.Yediyurappa
कॅप्टन अमरिंदरसिंगांवर दबाव टाकला जातोय! काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मोठा प्रश्न भाजप नेतृत्वासमोर आहे. येडियुरप्पांना त्यांचे पुत्र व पक्षाचे उपाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र यांच्यामुळे राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा होती. तसेच, विजयेंद्र यांना नव्या मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले नव्हते. येडियुरप्पांनी आग्रह धरूनही नेतृत्वाने विजयेंद्र यांना डावलले होते. यामुळे येडियुरप्पा नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे.

Basavraj Bommai and B.S.Yediyurappa
डान्सबार पडला महागात! पोलीस आयुक्तांकडून बदली न करता वरिष्ठ निरीक्षकाचे थेट निलंबन

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com