नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) वाढदिवसाचे औचित्य साधून सरकारने कोरोना लसीकरणाचा (Covid Vaccination) नवा विक्रम केला होता. एकाच दिवसात तब्बल अडीच कोटी नागरिकांना कोरोना लस देण्यात आली होती. परंतु, या विक्रमातील सावळगोंधळ आता समोर येऊ लागला आहे. त्या दिवशी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींनाही लस दिल्याचे प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
कोरोना लसीकरणाचा विक्रम चीनच्या नावावर होता. चीनने एकाच दिवशी तब्बल 2.47 कोटी नागरिकांना कोरोना लस दिली होती. केंद्र सरकारने चीनचा विक्रम मोडीत काढण्याचे उद्दिष्ट्य ठरवले होते. भाजप नेत्यांनी ट्विटरवर नागरिकांना कोरोना लसीकरणाचे आवाहन केले. त्या दिवशी तब्बल अडीच कोटी नागरिकांना कोरोना लस दिल्याचे सांगून सरकारने आपली पाठ थोपटून घेतली होती.
आता या विक्रमातील सावळागोंधळ समोर आला आहे. मोदींच्या वाढदिवशी 17 जुलैला अडीच कोटी नागरिकांना लस दिल्याचा दावा केला होता. यात एकट्या मध्य प्रदेशमध्ये 27 लाख जणांना लस दिल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींनाही लस घेतल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे. अनेक व्यक्तींना लस न घेताही प्रमाणपत्रे देण्यात आल्याची बाबही समोर येऊ लागली आहे.
आगरमाळवा येथील विद्या शर्मा यांचा कोरोनामुळे चार महिन्यांपूर्वी मृत्यू झाला आहे. असे असताना त्यांचा मुलगा आशुतोष याला त्याच्या आईचे कोरोना लसीकरण झाल्याचे मेसेज मोबाईलवर आला. तसेच, मोदींच्या वाढदिवशी लसीकरणाचा नवा विक्रम नोंदवण्यात आल्याचे त्यात म्हटले होते. यानंतर आशुतोष यांना धक्काच बसला. असे अनेक प्रकार आता समोर येऊ लागले आहेत. यामुळे लसीकरणाच्या विक्रमातील फोलपणा उघड होऊ लागला आहे.
देशात सध्या 5 कोरोना लशी उपलब्ध आहेत. देशातील लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या माध्यमातून या लशीचा पुरवठा होणार आहे. आधी देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या चार लशींचा वापर लसीकरणासाठी होत होता. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या या सिंगल डोस कोरोना लशीच्या तातडीच्या वापरासही सरकारने परवानगी दिली आहे.
सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.