मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती (Panchayat Samiti) पोटनिवडणुकांच्या मतदानाला जेमतेम दहा दिवस बाकी असताना या निवडणुका (Election) पुढे ढकलण्याची राज्य सरकारची विनंती राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलणे शक्य नाही, असा निर्वाळा राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत अध्यादेश सरकारने काढला आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुका पुढे ढकलण्याची मागणी सरकारने आयोगाकडे केली होती. सर्वोच्च न्यायाल्याच्या आदेशानेच निवडणुका होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले तरच निवडणुकीचा कार्यक्रम थांबवून त्यात बदल शक्य आहे,असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, असेही आयोगाने अप्रत्यक्षपणे सुचविल्याचे मानले जात आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन मतदान 10 दिवसावर आले आहे. या परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली तरीही निवडणुका पुढे ढकलण्याबाबत न्यायालय निर्देश देईल याची हमी नाही, अशी शक्यताही व्यक्त होत आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती पोटनिवडणुकींचा कार्यक्रम निवडणूक निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याने सर्व पक्षांनी ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम राहावे, अशी भूमिका घेतली. यामुळे राज्य सरकाने ओबीसी आरक्षणाबाबत अध्यादेश काढला. त्यावर राज्यपालांची सही झाल्यानंतर राज्य सरकारने निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती. आयोगाने याबाबात असमर्थता दर्शविली आहे.
जिल्हा परिषदा आणि जागा
धुळे - 15, नंदूरबार - 11, अकोला - 14, वाशिम -14, नागपूर -16, पालघर-पोटनिवडणूक
पंचायत समित्या आणि जागा
धुळे -30, नंदूरबार -14, अकोला -28, वाशिम-27, नागपूर -31
जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम
15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर अर्ज दाखल करणे
21 सप्टेंबर अर्जाची छाननी
29 सप्टेंबर अर्ज मागे घेणे
5 ऑक्टोबरला मतदान
6 ऑक्टोबरला मतमोजणी
किती जागांसाठी निवडणूक
जिल्हा परिषदेच्या 85 जागा
पंचायत समितीच्या 144 जागा
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.