शिंदे-फडणवीस सरकारकडून पालकमंत्र्यांची घोषणा; कुणाला मिळाला कोणता जिल्हा पहा...

सोलापूरची जबाबदारी विखे पाटलांकडे, तर चंद्रकांत पाटील पुण्याचे कारभारी
Shinde-Fadnavis government
Shinde-Fadnavis governmentSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारला पालकमंत्री (Guardian Minister) नेमण्यास अखेर मुहूर्त मिळाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे, तर फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्री असतील. बहुचर्चित औरंगाबादची जबाबदारी शिंदे गटाच्या संदीपान भूमरे यांच्याकडे देण्यात आली आहे. (Guardian Minister announcement from Shinde-Fadnavis government)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

Shinde-Fadnavis government
त्या मोठ्या नेत्यानेही स्वतंत्र सहकार मंत्रालय बनवलं नाही : सीतारामन यांचा पवारांवर नाव न घेता निशाणा

पालकमंत्री न नेमल्यामुळे विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येत होती. पालकमंत्र्यांच्या ऐवजी यंदाच्या स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावरूनही विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. तब्बल दीड महिन्यानंतर पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला असून जिल्हानिहाय पालकमंत्री निश्चित झाली आहे.

Shinde-Fadnavis government
तानाजी सावंतांची जिभ घसरली; टीका करताना उद्धव ठाकरेंची लाज काढली...

जिल्हानिहाय पालकमंत्री पुढीलप्रमाणे :

राधाकृष्ण विखे पाटील : नगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर, गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे, लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील- बुलडाणा,

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड

तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर -मुंबई शहर, कोल्हापूर,

अतुल सावे- जालना, बीड,

शंभूराज देसाई- सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com