मुख्यमंत्र्यांच्या मागे शंभरहून अधिक आमदार असल्याने त्यांची खुर्ची भक्कम!

पंजाबनंतर आता राजस्थानमध्येही नेतृत्व बदलाच्या चर्चेने जोर पकडला आहे.
Ashok Gehlot
Ashok GehlotFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबनंतर (Punjab) आता राजस्थानमध्येही (Rajasthan) नेतृत्व बदलाच्या चर्चेने जोर पकडला आहे. मुख्यमंत्री (Chief Minister) अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद कायम आहे. यामुळे गेहलोत यांना हटवण्यात येईल, अशी चर्चा सुरू आहे. यावर अखेर गेहलोत यांचे निकटवर्तीय महसूल मंत्र्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्र्यासोबत शंभरहून अधिक आमदार असून, त्याचे राहुल गांधींशीही चांगले संबंध आहेत, असेही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

पंजाबमध्ये पक्षांतर्गत वादामुळे अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यात आले. आता याची पुनरावृत्ती पंजाबमध्ये होणार अशी चर्चा सुरू आहे. यावर बोलताना महसूलमंत्री हरीश चौधरी म्हणाले की, पंजाब आणि राजस्थानमधील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यांची तुलना होऊ शकत नाही. पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदरसिंगांना आमदारांनी एकटे पाडले होते. परंतु, राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्यासोबत शंभरहून अधिक आमदार आहेत.

विशेष म्हणजे चौधरी हे पंजाबमध्ये काँग्रेसचे निरीक्षक होते. त्यांच्यासह इतर निरीक्षकांच्या देखरेखीखाली कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि नवीन मुख्यमंत्र्यांची निवड झाली. याबाबत बोलताना चौधरी म्हणाले की, काँग्रेसने कॅप्टन यांना भरभरून दिले आहे. पंजाबमधील आमदारांनाच नेतृत्वात बदल हवा होता. पंजाबमधील बदल हा लोकशाही पद्धतीने झालेला आहे. अमरिंदरसिंग यांचा कोणताही अपमान झालेला नाही. आमदारांनीच ते नकोत, अशी इच्छा व्यक्त केली होती.

Ashok Gehlot
'सीपीआय' सोडताना कन्हैयाने पक्षाच्या कार्यालयातील 'एसी'ही सोबत नेला

मागील काही दिवसांपासून गेहलोत आणि पाललट गटामध्ये संघर्ष वाढला आहे. काही दिवसांपूर्वी सचिन पायलट हे दिल्लीतही गेले होते. त्यांनी केलेल्या मागण्यांवर वर्षभरानंतरही पक्षाने निर्णय न घेतल्याने ते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रभारी अजय माकन हे नुकतेच राज्यात दाखल झाले होते. त्यांची गेहलोत यांच्यासह पायलट गटाचीही बैठक घेतली होती. पायलट समर्थकांना पक्ष संघटनेत आणि सरकारमध्ये स्थान देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली होती. यातच सिद्धू यांचे बंड पंजाबमध्ये यशस्वी पायलट यांनी पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे.

Ashok Gehlot
राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमध्ये नवी फायरब्रँड एंट्री : कॉम्रेड कन्हैया अन् जिग्नेश मेवानी

पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली आहे. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला विरोध केला आहे. राजस्थानध्ये मंत्रिमंडळात 30 पर्यंत मंत्री असू शकतात. सध्या मुख्यमंत्री गेहलोत यांच्यासह 21 मंत्री आहेत. सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com