शिंदे सरकारच्या भवितव्याची सुनावणी घटनापीठासमोर; पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगास निर्देश

निवडणूक आयोगातील सुनावणीलाही उध्दव ठाकरे गटाने आक्षेप घेतल्याने व तेथील सुनावणीत ठाकरे गटाला आपले म्हणणे मांडण्यासाठी आजच अखेरची मुदत दिल्याने न्यायालयाने आणखी दोन दिवसांनी याची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला.
power struggle in Maharashtra
power struggle in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण विस्तारित अशा पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपविण्यात येणार आहे. येत्या गुरूवारी (ता. २५ ऑगस्ट) या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सक्रिय साथीने शिवसेनेतील (shivsena) एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यासह ५० आमदारांचा गट शिवसेनेपासून वेगळा झाल्यावर शिवसेना नक्की कोणाची, उध्दव ठाकरे यांची की शिंदे यांची, या राज्यातील अत्यंत महत्वाच्या प्रकरणाची सुनावणी घटनापीठाकडे सोपविण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme Court) खंडपीठाने आज घेतला. (Hearing of power struggle in Maharashtra is now before Constitution Bench)

या प्रकरणी निवडणूक आयोगातील सुनावणीलाही उध्दव ठाकरे गटाने आक्षेप घेतल्याने व तेथील सुनावणीत ठाकरे गटाला आपले म्हणणे मांडण्यासाठी आजच अखेरची मुदत दिल्याने न्यायालयाने आणखी दोन दिवसांनी याची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. राज्यपालांनी नव्या सरकारला शपथ देणे, तत्कालीन उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी घेतलेला, शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रततेचा निर्णय आदी मुद्यांवरील ५ याचिका न्यायालयासमोर सुनावणीसाठी आहेत. या प्रकरणी राज्यपालांनी शिंदे फडणवीस सरकारला बहुमताची चाचणी करायला सांगितली, ती घटनात्मकदृष्ट्या वैध होती का, या महत्वाच्या मुद्याचा निर्णय घटनापीठाने दिल्यावरच उर्वरित प्रकरणाचे भवितव्य ठरणार आहे. याच दरम्यान निवडणूक आयोग हा शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कोणाकडे रहाणार याचाही महत्वाचा निर्णय घेणार आहे.

power struggle in Maharashtra
भाजप दोन महिलांना देणार मंत्रिपदाची संधी; माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे यांची नावे आघाडीवर

सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती कृष्ण मुरारी व न्यायमूर्ती हिमा कोहली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. यामुळे नवीन सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळित यांच्यासमोर या प्रकरणाचा अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. येत्या गुरूवारच्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत मुख्यतः सुनावणी होईल. दरम्यानच्या २ दिवसांत ५ सदस्यीय घटनापीठाची रचना अंतिम करण्यात येईल. त्या पीठामध्ये कोण असणार याचा निर्णय न्या. रमण्णा हेच घेतील. तो सरन्यायाधीश म्हणून न्या. रमण्णा यांचा अखेरचा दिवस असेल. ते या घटनापीठात असतील, तर त्यांची जागा नवीन सरन्यायाधीश न्या. लळित घेतील.

power struggle in Maharashtra
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी तयार? भाजपला आठ तर शिंदे गटाला चार जागा...

चार ऑगस्टनंतर सलग ४ वेळा सुनावणी स्थगित झालेल्या या प्रकरणी आज सुनावणी होणार का, याचा निर्णय सकाळीही झालेला नव्हता. काल रात्री व आज सकाळी आलेल्या आजच्या प्रकरणांच्या यादीत हे प्रकरण नव्हते. मात्र सकाळी साडेअकरानंतर न्यायालयाच्या संकेतस्थळावर, आजच या प्रकरणी सुनावणी ऐनवेळी सुनावणीला येणार असल्याची माहिती प्रकटली. त्यातही प्रथम दुपारी साडेबारा वाजता सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश रमण्णा निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. आणखी तीनच दिवसांत ते निवृत्त होत असून मावळते सरन्यायाधीश घटनात्मकदृष्ट्या संवेदनशील प्रकरणी अंतिम निकाल देण्याचे टाळतात, ही परंपरा आहे. घटनेच्या परिशिष्ट 10 च्या प्रकाशात राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल येणार असल्याने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणाच्या व घटनात्मकदृष्ट्याही हे प्रकरण अतिशय संवेदनशील ठरणार आहे.

शिंदे गटाच्या १६ आमदारांचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मागील दोन्ही सुनावणीत दोन्ही बाजूच्या ज्येष्ठ वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी 8 ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र, ही तारीख बदलून 12 ऑगस्ट करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा बदलून 22 ऑगस्ट करण्यात आली होती. यापूर्वी 3 आणि 4 ऑगस्ट अशी सलग दोन दिवस सुनावणी झाली होती. तेव्हापासूनच सातत्याने हे प्रकरण पुढे ढकलले जात होते. शिवसेनेसाठी हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे त्यांनी आज हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या वतीनं तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली.

राज्यात फडणवीस-शिंदे सरकार स्थापन झालं असलं, तरी सत्तापेच मात्र कायम आहे. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत 'तारीख पे तारीख'चं सत्र सुरु झाले आणि जूनपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाच्या केवळ ऑगस्टमध्ये सलग चार तारखा लांबणीवर गेल्या. या प्रकरणी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाने आपले म्हणणे आजपर्यंत मांडावे असे निर्देश दिले आहे. मागच्या सुनावणीत न्यायालयाने आयोगाला महत्वाचे निर्णय घेऊ नका, असे तोंडी निर्देश दिले होते. पण कारवाई थांबवली नव्हती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com