कन्हैया कुमार हा दुसरा सिद्धू असून, तो काँग्रेसला उध्वस्त करणार!

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये दाखल झाला आहे.
Kanhaiya Kumar
Kanhaiya Kumar
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (CPI) नेता व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) काँग्रेसमध्ये (Congress) दाखल झाला आहे. यावरून आता राष्ट्रीय जनता दलाने (RJD) आपला सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसला धोक्याचा इशारा दिला आहे. पंजाबमधील नवज्योतसिंग सिद्धूप्रमाणेच कन्हैया काँग्रेसला उध्वस्त करेल, असे आरजेडीने म्हटले आहे.

काँग्रेस हे मोठे जहाज असून, ते वाचवण्याची आवश्यकता आहे, असे कन्हैयाने म्हटले होते. यावर आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी म्हणाले की, कन्हैया हा दुसरा नवज्योतसिंग सिद्धू आहे. पंजाबमध्ये सिद्धूने काँग्रेस नष्ट केली तसे कन्हैया करेल. कन्हैयाच्या प्रवेशाने पक्षाच्या स्थितीत कोणतीही सुधारणा होणार नाही. तो पक्षाला वाचवू शकणार नाही. काँग्रेस एक बुडते जहाज असून, त्याला कोणतेही भविष्य नाही.

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत महाआघाडीत काँग्रेसचा समावेश आहे. या आघाडीने बिहारमध्ये मागील विधानसभा निवडणुका एकत्र लढवल्या होत्या. आता कन्हैयाला पक्षात प्रवेश देताना काँग्रेसने सहकारी पक्ष असलेल्या आरजेडीला विश्वासात घेतले नाही. यामुळे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील आरजेडीमध्ये काँग्रेसबद्दल नाराजीचे वातावरण आहे. कन्हैयावर आरजेडीने केलेल्या टीकेवर उत्तर देण्यास काँग्रेस नेत्यांनी नकार दिला आहे.

Kanhaiya Kumar
किम यांचा जगाला धक्का : एका बाजूला शांतीचे गोडवे अन् दुसऱ्या बाजूला डागले मिसाईल

महात्मा गांधी जयंतीदिनी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी हे काँग्रेसमध्ये दाखल होणार होते. परंतु, हा पक्षप्रवेशाचा मुहूर्त अलिकडे आणण्यात आला. हे दोघेही 28 सप्टेंबरला हुतात्मा भगतसिंग यांच्या जयंतीदिवशी काँग्रेसमध्ये गेले आहेत. दोघांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम काल झाला. या दोघांच्या रुपाने राष्ट्रीय राजकारणात अतिशय आक्रमक आणि लोकप्रिय असलेले दोन तरुण चेहरे काँग्रेसला मिळाले आहेत.

Kanhaiya Kumar
कॅप्टन अमरिंदरसिंगांवर दबाव टाकला जातोय! काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

कन्हैया काँग्रेसवासी होण्याआधी सीपीआयच्या कार्यालयातील एसी काढून नेल्याचा प्रकार समोर आला होता. सीपीआयचे बिहार चिटणीस राम नरेश पांडे यांनी याबाबत माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, काही दिवसांपूर्वी कन्हैया हा पक्षाच्या राज्य कार्यालयात आला होता. त्याने कार्यालयात लावलेला एसी काढून नेला. त्याने स्वत:च्या पैशातून तो एसी लावलेला होता, त्यामुळे मी त्याला मंजुरी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com