नगरसेविकेच्या कार्यालयातच विनयभंग झाल्याने भाजप बॅकफूटवर

भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
BJP
BJP File Photo
Published on
Updated on

मुंबई : भाजप (BJP) नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग (Molestation) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेला भाजप बॅकफूटवर गेला आहे. आता महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

भाजपा नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला आहे. भाजप कार्यकर्त्याने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही महिला समाजसेविका आहे. विनयभंगाची तक्रार आमदार आणि खासदार यांच्याकडे केली म्हणून नगरसेविका आणि सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोपही संबंधित महिलेने केला आहे. या विरोधात महिनाभरापूर्वी तक्रार करूनही गुन्हा दाखल झाला नव्हता. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे दाद मागितल्यावर बोरीवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पीडित महिला मागील वर्षी नगरसेविका खेडेकर यांच्या संपर्क कार्यालयात आली होती. तिथे तिची प्रतिक साळवी याच्याशी भेट झाली. त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले होते. साळवीने या महिलेला 14 ऑगस्टला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खेडेकर यांच्या वझिरा नाका येथील कार्यालयात बोलवले . ती महिला कार्यालयात आल्यानंतर त्याने तिचा विनयभंग केला. याची तक्रार तिने स्थानिक खासदार आणि आमदार यांच्याकडे केली होती.

यानंतर नगरसेविका खेडेकर यांनी त्या महिलेला फोन करून कार्यालयात बोलावून घेतले. तक्रार का केली? अशी विचारणा त्यांना तिला केली. साळवीने केलेला प्रकार त्या महिलेने खेडेकर आणि तिथे उपस्थित असलेल्यांना सांगितला. त्यावेळी तिला मारहाण करीत ऑफिस बाहेर हाकण्यात आले, असा आरोपही पीडित महिलेने केला आहे.

BJP
त्या न्यायाधीशांची ठरवूनच हत्या! सीबीआय तपासात धक्कादायक माहिती उघड

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन भाजपच्या 12 महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून प्रश्न उपस्थित केले होते. आता भाजप नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेचा विनयभंगाचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. यात भाजप कार्यकर्ता आरोपी असल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून राज्य सरकारविरोधात आक्रमक झालेला भाजप अचानक बॅकफूटवर गेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com