Jhansi Medical College Fire : मेडिकल कॉलेजमध्ये भीषण आग, 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

UP Jhansi Medical College Fire News : उत्तर प्रदेशातील झाशीत काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये आग लागल्याने 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
Jhansi Medical College Fire
Jhansi Medical College FireSarkarnama
Published on
Updated on

Jhansi Medical College Fire News : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झाशीत काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये (Jhansi Medical College Fire) आग लागल्याने 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

मेडिकल कॉलेजच्या नवजात शिशु वार्डमध्ये (NICU) भीषण आग लागल्याने या मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या वार्डमधील इतर नवजात बालकांना खिडकी तोडून वाचवण्यात यश आलं आहे.

शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वॉर्डात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी या घटनेव दु:ख व्यक्त करत ताबडतोब चौकशीचे आदेश दिले आहेत.

Jhansi Medical College Fire
Delhi Pollution : प्रदुषणामुळे राजधानी बेहाल; मुख्यमंत्र्यांनी सरकारी कार्यालयांबाबत घेतला मोठा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमधील नवजात शिशु वार्डमध्ये (NICU) भीषण आग लागली. या आगीमुळे या वार्डमधील 10 नवजात बालकांचा मृत्यू (10 newborns died) झाला. तर १६ जखमी झाले आहेत. यातील 37 बालकांना खिडकीच्या काचा तोडून वाचवण्यात आलं आहे. तर ही आग शॉर्ट सक्रिटमुळे लागल्याचं सांगितलं जात आहे.

Jhansi Medical College Fire
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणाची फाईल बंद!

आगीची घटना घडताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता. मुलांचे पालक आक्रोश करत बाळांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान, अग्निशामन दलाने 37 मुलांना सुखरूप बाहेर काढलं आहे. तर ही दुर्घटना घडली त्यावेळी या वार्डमध्ये 54 नवजात बालकं होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com