Cabinet Minister Resigns : 11 आमदार फुटले अन् 8 भाजपात गेले; पक्षाध्यक्षाने मंत्रि‍पदाचा राजीनामा!

MLAs Split 8 Join BJP : 12 पैकी 11 आमदार सोडून गेल्यानंतर पक्षाध्याक्षाने आपल्या कॅबिनेट मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे.
11 MLAs break away and eight join the BJP
11 MLAs break away and eight join the BJPSarkarnama
Published on: 
Updated on: 

BJP Politics : मेघालायमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सरकारमध्ये सहभागी असलेल्या युनाइटेड डेमोक्रेटीक पार्टीचे (युडीएफ) प्रमुख, कॅबिनेट मंत्री मेतबाह लिंगदोह यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या पक्षाचे 12 आमदार होते. मात्र, यापूर्वीच 11 आमदार पक्ष सोडून गेले आहे. 8 जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर, तिघांनी मुख्यमंत्री तिघांनी मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्या एनपीपी पक्षात प्रवेश केला आहे.

मेतबाह लिंगदोह यांनी आपल्या राजीनाम्या विषयी बोलताना म्हटले की, सध्या राजकीय परिस्थिती पाहता आणि पक्षांतर्गत घडामोडींमुळे आपण राजीनामा देत आहे. राजीनाम्यासाठी त्यांच्यावर दबाव असल्याचा दावा त्यांनी फेटाळला. ते म्हणाले, हा निर्णय मी स्वतः मर्जीने घेतला आहे कोणाच्या दबावाखाली नाही.

लिंगदोह यांनी सांगितले की, त्यांच्या पक्षाचे पुढचे पाऊले हे ज्यांनी पक्षांला धोका दिला त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात असेल. पक्षाच्या घटनेनुसार पक्षाला सोडून गेलेल्यांवर कारवाई करण्यात येईल. पक्षाच्या सर्वोच्च समितीच्या बैठकीमध्ये यावर चर्चा होईल. त्यानंतर कारवाई केली जाईल.

भाजपमध्ये गेलेले आमदार कोण?

खमेन रिम्बुई, पियस मार्वेन, किरमेन शीला, मेयरालबोर्न सिएम, मैथ्यू बियॉन्डस्टार कुरबाह, ओलन सिंह सुइन, बालाजीद कुपर सिनरेम आणि सिनशर कुपर रॉय या आमदारांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. तर मुख्यमंत्र्यांच्या एनपीपीमध्ये तीन आमदारांनी प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.