Ajit Pawar On Tekwade : अशोक टेकवडेंच्या भाजप प्रवेशाचे अजितदादांनी सांगितले कारण : ‘मध्यंतरी त्यांच्याकडे इन्कम टॅक्सचा...’

अशोक टेकवडे यांना आमदारकीचं तिकिटही मीच दिलं होतं. पुरंदरमध्ये दादा जाधवराव यांचे वर्चस्व हेाते. तरीदेखील त्या निवडणुकीत आम्ही त्यांना निवडून आणलं.
Ajit Pawar-Ashok Tekwade
Ajit Pawar-Ashok Tekwade Sarkarnama

पुणे : माजी आमदार अशोकराव टेकवडे यांचे पुरंदरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांशी जमतं नव्हत. तसेच, टेकवडे यांच्या राष्ट्रवादी सोडण्यामागे आणखी काही कारणे आहेत. मध्यंतरी त्यांच्याकडे इन्कम टॅक्स विभागाचाही छापा पडला होता. त्यावेळी काही कागदपत्रं मिळाल्याचे कानावर आलं होतं, असं पक्षाचे प्रदीप गारटकर यांनी आज मला सांगितले, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. (Ajit Pawar said about Ashok Tekwade's entry into BJP)

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार अशोक टेकवडे (Ashok Tekwade) यांच्या भाजप (BJP) सोडण्याच्या मागील कारण पुढं आणलं. ते म्हणाले की, माजी आमदार अशोक टेकवडे यांना मीच तयार केले होते. त्यांना मीच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक, पुढे जाऊन अध्यक्षही केले होते.

Ajit Pawar-Ashok Tekwade
Karnataka Election Result : अशोक चव्हाण यांची भाची कर्नाटकच्या निवडणुकीत पराभूत

अशोक टेकवडे यांना आमदारकीचं तिकिटही मीच दिलं होतं. पुरंदरमध्ये दादा जाधवराव यांचे वर्चस्व हेाते. तरीदेखील त्या निवडणुकीत आम्ही त्यांना निवडून आणलं. त्यानंतरच्या काळात पक्षातील इतर नेत्यांशी त्यांचं जमत नव्हतं. मी टेकवडे यांच्याशी आणि ज्यांच्याबरोबर त्यांचं जमत नव्हतं, त्यांच्याशीही चर्चा केली. चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, एखाद्याने मनाचा पक्का निश्चिय केला असेल तर तो काय कुणाचं ऐकेल असं नसतं. कारण, आज सकाळपासून माझ्या पक्षाचे पुणे जिलहाध्यक्ष प्रदीप गारटकर हे त्यांच्या घरी जाऊन बसले हेाते. त्यांनी सांगितले की, मी आणि माझ्या मुलाने भाजप प्रवेशाचा पक्का निर्णय घेतला आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar-Ashok Tekwade
Karnataka's Giant Killer's : आरोग्य मंत्री, माजी मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांना धूळ चारणारे कर्नाटकातील ‘जायंएट किलर’!

अजित पवार म्हणाले की, अशोक टेकवडे यांचे वडील पवारसाहेबांचे कट्टर कार्यकर्ते होते. जवळार्जून भागातील ते नेते हेाते. मी खासदार झाल्यापासूनच त्यांना जवळ केले होते. माझ्या परीने आणि पक्षाच्या माध्यमातून जी काय ताकद आणि शक्ती देण्याचा प्रयत्न केला. पण, स्थानिक वाद झाल्यानंतर आम्ही प्रयत्न करत असतो. पण, दुर्दैवाने आम्हाला त्यातून मार्ग काढता आलेला नाही. म्हणून टेकवडे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपत जाण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

Ajit Pawar-Ashok Tekwade
Karnataka Election Result : कर्नाटकात काँग्रेसचे संख्याबळ एकने घटले : चारवेळा मतमोजणी अन्‌ बरंच काही घडलं...

अशोक टेकवडे यांच्या राष्ट्रवादी सोडण्यामागे आणखी काही कारणे आहेत. मध्यंतरी त्यांच्याकडे इन्कम टॅक्स विभागाचाही छापा पडला होता. त्यावेही काही कागदपत्रं मिळाल्याचे माझ्या कानावर आले होते, असे प्रदीप गारटकर यांनी मला आज सांगितले. त्यामुळं काय काय घडतंय आणि काय काय ऐकायला मिळतंय, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com