Mumbai News: शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत वेगळ निकाल लागला. वेगळा निकाल लागणारच नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांचा निकाल काय असणार, हे अवघ्या चार शब्दांत सांगून टाकले आहे. (What will be the decision of the Assembly Speaker? : Ajit Pawar told in four words....)
अजित पवार (Ajit Pawar) हे आज माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपत्रातेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) सर्वोच्च न्यायालयाने सोपवला आहे. त्याबाबत अजित पवार बोलत होते. त्यांच्या बोलण्याला विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या नियुक्तीला दिलेली मान्यतेवर न्यायालयाने खडे बोल सुनावले होते, तो संदर्भ होता.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत यदा-कदचित वेगळा निकाल लागला. वेगळा निकाल लागणारच नाही. पण लागला तरीदेखील सरकारच्या बहुमतावर कुठलाही परिणाम होत नाही. २८८ मधून १६ गेले तर तरीही त्यांचे २७२ आमदार राहतात. त्यामुळे २७२ चे बहुमत त्यांच्याकडे आहे. पण त्याचा फार काही परिणाम होईल, असे सध्यातरी दिसत नाही.
राहुल नार्वेकर यांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे, असा शिवसेनेचा दावा आहे. तेा नव्याने पुढे आलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालात त्यांनी असंही सांगितलं आहे की, विधानसभेचे अध्यक्षच सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतील. कारण आजपर्यंत राज्यात अशा घटना घडलेल्या होत्या, त्यावेळी पक्षांतर बंदी कायद्यानुसार विधानसभा अध्यक्षांनीच अपात्रतेबाबतचा निर्णय घेतला हेाता.
अरुण गुजराथी विधानसभेचे अध्यक्ष असताना त्यांनीही सहा आमदारांना पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरविले होते. कारण, त्या सहा आमदारांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले होते, असेही पवार यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे परदेश दौऱ्यावर आहेत. शिवसेनेनेही त्यांसंबंधीचे निवेदन आजच देण्याचे ठरविले हेाते, त्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे शिवसेनेने सोळा आमदारांबाबत आपलं म्हणणं दिलं आहे. विधानसभा उपाध्यक्षांनी त्यांना पोहोच दिली असेल. राहुल नार्वेकर आल्यानंतर झिरवळ त्यांच्याकडे हे निवदेन सुपूर्त करतील. नार्वेकर त्याबाबतचा निर्णय घेतील, असं मला वाटतं. कारण, शेवटी हा विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा अधिकार आहे, त्यामुळे ते दोघं याबाबत ठरवतील, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.