Arvind Kejriwal Bail : मोठी बातमी! केजरीवालांसाठी तब्बल 150 वकिलांनी सरन्यायाधीशांना लिहिलं पत्र; म्हणाले, 'जामीन रोखला ही...'

Arvind kejriwal bail 150 lawyers letter To chief justice : मुख्यमंत्री केजरीवाल यांना निवडणुकीच्या काळात जामीन मिळाला होता. मात्र, निवडणूक संपताच त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागले.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

Arvind Kejriwal News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कथित मद्य धोरण भ्रष्टाचार प्रकरणी तिहार तुरुंगात आहेत. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल होता. मात्र, ईडीने दिल्ली हायकोर्टात धाव घेत या जामीनावर स्थगिती आणली. हायकोर्टाच्या जामीनावर स्थगिती देण्याच्या निर्णया विरोधात दिल्लीतील तब्बल 150 वकिलांनी प्रश्न चिन्ह उपस्थित करत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात वकिलांनी म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर सीजीआयने घातलेली स्थगिती जाणूनबुजून लांबवली जात आहे. केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर न्यायाधीश दिरंगाई करत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल Arvind kejriwal यांना ईडीने 21 मार्च रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. निवडणुकीच्या काळात त्यांना जामीन मिळाला होता.मात्र, निवडणूक संपताच त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागले. मात्र 20 जूनला केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला होता. मात्र, लगेच सीबीआयने त्यांना आणखी एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली.

Arvind Kejriwal
Digambar Kamat : माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सरदेसाईंचा जनता दरबार; कामतांनी एका वाक्यातच विषय मिटवला

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर जैन यांनी केजरीवाल यांच्या जामीनाविरोधात सुनावणी करू नये. कारण न्यायमूर्ती सुधीर जैन यांचा भाऊ अनुराग जैन हे ईडीचे वकील आहेत, असे वकिलांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Arvind Kejriwal
Anil Ambani News : अनिल अंबानींवर शिंदे सरकार मेहरबान; संकटातून बाहेर पडण्यासाठी 1700 कोटींच बँकेचे कर्ज फेडणार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com