भाजपशासित राज्यांमध्ये दिवाळी, इतर ठिकाणी मात्र चर्चांचे गुऱ्हाळ

हा निर्णय म्हणजे मोदी सरकारकडून मिळालेला मोठा दिलासा असल्याची भावना व्यक्त होत आहे
Narendra Modi - BJP
Narendra Modi - BJPSarkarnama
Published on: 
Updated on: 

मुंबई : केंद्र सरकारने नुकताच पेट्रोल (Petrol) आणि डिझेलवरील (Diesel) अबकारी करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काल पासून पेट्रोल ५ रुपयांनी आणि डिझेल १० रुपयांनी स्वस्त झाले आहे. मागच्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे देशातील जनता हैराण होती. या दरवाढीचा परिणाम जनसामान्यांशी निगडीत जवळपास प्रत्येक गोष्टीवर झाला होता. या पार्श्वभुमीवर हा निर्णय म्हणजे मोदी (Modi Government) सरकारकडून मिळालेला मोठा दिलासा असल्याची भावना व्यक्त होत आहे. तसेच दिवाळीच्या तोंडावरच हा निर्णय आल्यामुळे 'दिवाळी गिफ्ट' मिळाले असल्याचे म्हंटले जावू लागले आहे.

केंद्र सरकारने हा कर कमी करताना राज्यांनीही आपला कर कमी करावा असे आवाहन केले होते. त्यानुसार गुजरात, सिक्किम, आसाम, त्रिपुरा, कर्नाटक, मणिपूर, पुडुच्चेरी, मिझोरम, गोवा, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, बिहार, उत्तराखंड या भाजपशासित राज्यांनी तत्परता दाखवत व्हॅट कपात जाहीर केली आहे. त्यामुळे या सर्व भाजपशासित किंवा भाजपच्या मित्रपक्षांचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होत आहे.

Narendra Modi - BJP
मोदी सरकारनं पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं दिलं हे उत्तर

पण बिगर भाजप राज्यांनी मात्र व्हॅट कपात करण्यासाठी कोणतीही पावलं उचलेली दिसून येत नाहीत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब, दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांनी जनतेला कोणताही दिलासा जाहीर केलेला नाही. भाजपशासित राज्यांबरोबरच अन्य राज्येही व्हॅटमध्ये कपात करतील, असा अंदाज कालपर्यंत वर्तवण्यात येत होता. पण या ठिकाणी अजूनही चर्चांच करण्यात येत आहे.

तर केरळने व्हॅट कमी करणार नसल्याचे स्पष्ट केले असून, पश्चिम बंगालनेही विधानसभा निवडणुकीपूर्वीच व्हॅट २ रुपयांनी कमी केला असल्याचे सांगितले आहे. या पलिकडे जावून राजस्ठान सरकारने केंद्राच्या अबकारी करानंतर राज्यांचा व्हॅट आपोआप कमी होत असल्याचे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com