Ajit Pawar on Eknath Shinde : "मला 'पिंक' होण्याची गरज नाही," CM शिंदेंच्या विधानावर अजितदादा म्हणाले...

Ajit Pawar Reacts to Shinde's Statement: तेलंगणातील माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यानंतर अजितदादांच्या 'पिंक' पॉलिटिक्सची चर्चा सगळीकडे सुरू आहे. यातच मुख्यमंत्री शिंदे यांनी 'पिंक' रंगावर भाष्य केलं आहे.
Ajit Pawar| Eknath Shinde
Ajit Pawar| Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार गट ) 'पिंक' ( गुलाबी ) रंगाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे, सभेसह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जॅकेटही 'पिंक' रंगाचे वापरत आहेत. अख्ख्या महाराष्ट्राला 'पिंक' रंगाचे कोडे पडले आहे. याच 'पिंक' रंगावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलेबाजी केली आहे.

"मला गुलाबी होण्याची गरज नाही," असा टोला मुख्यमंत्री शिंदे ( Eknath Shinde ) यांनी अजितदादांना लगावला होता. मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजितदादांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच आहे," असं अजितदादांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

माझ्या कपड्याचा रंग पांढरा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ( 15 सप्टेंबर ) पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली आहे. तेव्हा, "मला गुलाबी होण्याची गरज नाही. माझ्या कपड्याचा रंग पांढरा आहे. तो कुठल्याही रंगाला फिका ( अस्पष्ट ) करू शकतो. कुणातही मिसळू शकतो," असं विधान केलं होतं.

Ajit Pawar| Eknath Shinde
Eknath Shinde : महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र काय? CM शिंदेंनी सांगितला भाजपच्या निकषापेक्षा वेगळा 'फॉर्म्युला'

पांढरा रंग सगळ्यात चांगला...

मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्याबद्दल अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांना प्रसारमाध्यमांशी प्रश्न विचारल्यावर त्यांनी मिश्किल उत्तर दिलं आहे. अजितदादा म्हणाले, "पांढरा रंग सगळ्यात चांगला, स्वच्छ आहे. मी सुद्धा पांढरा शुभ्र सदरा घातला आहे. मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच आहे."

Ajit Pawar| Eknath Shinde
Uddhav Thackeray : 'मीच तुझा भाऊ, सर्व फुकट खाऊ'; महायुती सरकारवर उद्धव 'ठाकरी' शैलीत बरसले

मी काय ज्योतिषी नाही...

दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका होतील, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला होता. त्याबाबत विचारल्यावर अजितदादांनी म्हटलं, "मी काय ज्योतिषी नाही. किंवा निवडणूक आयोगाला मी बोललो नाही. निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेईल. थोडी कळ काढा. निवडणूक किती टप्प्यात घ्यावी, हा आयोगाचा अधिकार आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com