BJP MLA on MadhyaPradesh Mission : महाराष्ट्र भाजपचे 47 आमदार मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक मिशनवर!!

Madhya Pradesh Politics : विमानाने भोपाळमध्ये पोहचलेल्या टीमचे मध्य प्रदेश भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
BJP MLA on MadhyaPradesh Mission :
BJP MLA on MadhyaPradesh Mission :Sarkarnama

राजेंद्र त्रिमुखे

Nagar Politics : एखाद्या राज्यातील निवडणुकीसाठी पक्षाची सत्ता असलेल्या आजूबाजूच्या राज्यातील मंत्रिमंडळ, आमदार-खासदार यांना प्रचारात नियोजनबद्ध सक्रिय करण्याची भारतीय जनता पक्षाची नीती लवकरच होऊ घातलेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतही वापरली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज(19 ऑगस्ट) महाराष्ट्रातील भाजपच्या 47 आमदारांसह काही पदाधिकाऱ्यांची टीम मध्य प्रदेशकडे रवाना झाली आहे. राष्ट्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश, आ.राम शिंदे, आ.नितेश राणे, आ नारायण कुचे, आ.संतोष दानवे आदींचा यात समावेश आहे.

विमानाने भोपाळमध्ये पोहचलेल्या टीमचे मध्य प्रदेश भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. काही निवडणूक सर्व्हेमध्ये मध्य भारतात होणाऱ्या राज्यातील निवडणुकांत धोक्याची घंटा दाखवलेली आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात भाजपकडून प्रचाराची नियोजनबद्ध रणनीती तयार करण्यात आली असून उमेदवारी घोषणेत आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेशसह तेलंगणात राज्यातील आमदार प्रचारासाठी जाणार असून याची सुरुवात मध्य प्रदेश पासून आज करण्यात आली.

BJP MLA on MadhyaPradesh Mission :
Dhananjay Munde : अजित पवारांनी लाडक्या मुंडेंना दिली निम्म्या मराठवाड्याची `सुभेदारी`..

आज पासून पुढील सात दिवस मध्य प्रदेश मध्ये राहिल्यानंतर हे आमदार तेलंगणात जाणार आहेत. सलग ७ दिवस केंद्राकडून भाजपच्या आमदारांची एक प्रकारे ‘शाळा' घेतली जाणार असून याला मिशन मध्य प्रदेश असे नाव दिल्याचे समजते. रोज सकाळी 7 वाजल्यापासून सलग बारा तास या आमदारांवर पक्षाने खास बनवलेल्या ॲपद्वारे करडी नजर देखील ठेवली जाणार आहे.

कोण कोणत्या जिल्ह्यात जाणार??

1 ) जयकुमार रावल - नागोद विधानसभा - जिल्हा - सतना

2 ) मंगेश चव्हाण - कसरावद विधानसभा - जिल्हा - खरगोन

3 ) देवयानी फरांदे - देवास विधानसभा - जिल्हा - देवास

4) संजय कुटे - नेपानगर विधानसभा - जिल्हा - बुऱ्हाणपूर

5) रणधीर सावरकर - भैंसदेही विधानसभा - बैतुल

6 ) राम शिंदे - जुन्नारदेव विधानसभा - छिंदवाडा

7 ) रणजित सिह मोहिते पाटील - अमरवाडा विधानसभा जिल्हा छिंदवाडा

8) श्वेता महाले - जबलपूर पश्चिम विधानसभा - जबलपूर जिल्हा

9) नितेश राणे - बछीया विधानसभा - मण्डला जिल्हा

10) प्रवीण दरेकर - जबलपूर कैन्ट विधानसभा - जबलपूर जिल्हा

BJP MLA on MadhyaPradesh Mission :
Santosh Bangar Viral video : शिंदे गटाच्या आमदाराची अधिकाऱ्याला पुन्हा धमकी : ‘...तर तुम्हाला पायाखाली तुडविल’

मध्य प्रदेशमध्ये काय करणार नेमकं आमदार!!

-विधान सभा स्थरिय बैठक

-मन की बात

-विचार परिवार समन्वय बैठक

-लाभार्थी संपर्क अभियान

-विधान सभा स्थरिय अनाथालयास भेट

-वृद्धाश्रम दौरा

-युवकांसोबत बातचीत

-सोशल मीडिया संदर्भात चर्चा

-पत्रकार परिषदबैठ घेणे

-मंडल स्थरिय बैठक

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com