India-Pakistan War : मोठी बातमी! पाकिस्तानकडून दिल्लीवर हल्ला, मिसाईल डागले पण...

Pakistan Fires Fateh-1 Missile : पाकिस्तानकडून शुक्रवारी रात्री अमृतसर, सियालकोट तसेच सीमावर्ती भागांमध्ये ड्रोनच्या साह्याने 26 हल्ले केले. मात्र, भारतीय लष्काराने प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे सर्व ड्रोन नष्ट केले.
Indian Army intercepts and destroys Pakistan’s Fateh-1 missile targeting Delhi, preventing major disaster.
Indian Army intercepts and destroys Pakistan’s Fateh-1 missile targeting Delhi, preventing major disaster. sarkarnama
Published on
Updated on

India Pakistan War : पाकिस्तानकडून भारताची राजधानी दिल्लीवर शुक्रवारी रात्री फतेह 1 हे मिसाइल डागण्यात आले. दिल्लीवर करण्यात आलेल्या या हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत हे मिसाईल हवेतच नष्ट केले. भारतीय फायटर प्लेनने पाकिस्तानात घुसून त्याने एअरबसवर हल्ला चढवला. त्यामुळे पाकिस्तानची चरपड झाली.

पाकिस्तानकडून भारताच्या एअरबेसवर देखील हल्ले करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू, उधमपूर, पठाणकोट, बियास येथील एअरबसवर पाकिस्तानकडून हल्ले करण्यात आल्याची माहिती आहे. भारतीय लष्कराने हे हल्ले परतवल्याचे देखील सांगितले जात आहे.

Indian Army intercepts and destroys Pakistan’s Fateh-1 missile targeting Delhi, preventing major disaster.
Pakistan Defence Minister : पाकिस्तानी संरक्षणमंत्री पुन्हा बरळले; म्हणाले, ''आम्ही तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला, आता..''

पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले

पाकिस्तानकडून शुक्रवारी रात्री अमृतसर, सियालकोट तसेच सीमावर्ती भागांमध्ये ड्रोनच्या साह्याने 26 हल्ले केले. मात्र, भारतीय लष्काराने प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे सर्व ड्रोन नष्ट केले. या हल्ल्यामध्ये कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. पाकिस्तानकडून नागरिवस्तीत हल्ले करण्यात आले त्यामुळे घरांचे आणि गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

पाकिस्तानकडून गोळीबार

पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) गोळीबार करण्यात आला. शुक्रवारी रात्री जम्मू कश्मीर सीमावर्ती भागात गोळीबार करण्यात आला. तसेच ड्रोन हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यात आले. तसेच जम्मू आणि सांबामध्ये शुक्रवारी रात्री ब्लॅकआऊट करण्यात आले होते.

Indian Army intercepts and destroys Pakistan’s Fateh-1 missile targeting Delhi, preventing major disaster.
Amritsar drone strike : सुवर्णमंदिर असलेल्या अमृतसरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न; पाकिस्तानाच्या कुरापती, भारताचं जोरदार प्रत्युत्तर, संयम कधीही संपू शकतो...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com