Pawar Vs Modi : नरेंद्र मोदींना घायाळ करणारा शरद पवारांचा ‘दुसरा’...

Sharad Pawar PC News : शरद पवारांचे भाषण किंवा पत्रकार परिषद म्हणजे खुशीखुशीत भाष्य, हलके फुलके विनोद, पुणेरी चिमटे आणि टोले यांची रेलचेल असते.
Sharad Pawar-Narendra Modi
Sharad Pawar-Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शरद पवारांचे भाषण किंवा पत्रकार परिषद म्हणजे खुशीखुशीत भाष्य, हलके फुलके विनोद, पुणेरी चिमटे आणि टोले यांची रेलचेल असते. अनेकदा ते अशी फिरकी घेतात की पुढचा पार चारीमुंड्या चीत होतो. आता ते ‘दुसरा’ टाकून विरोधकांची विकेट काढलेलीही कळू देत नाहीत. आजच्या पत्रकार परिषदेत अशाच नर्मविनोदी शैलीत पवारांनी आपल्या एकेकाळच्या चेल्याची म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिरकी घेतली. (What was the need of Sharad Pawar's Darshan to Modi who went to see Sai Baba? : Sharad Pawar)

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यातील नाते जगजाहीर आहे. मोदींनी तर आपण पवारांचे बोट धरून राजकारण शिकलो, असे जाहीर विधान केले होते. तसेच, इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीचा प्रचंड विरोध होऊनही पवार हे मोदी यांच्या लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर गेले होते. त्यामुळे दोघांमधील नात्याची नेहमीच चर्चा होत असते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar-Narendra Modi
INDIA Bloc News : इंडिया आघाडीतही मतभिन्नता, विधानसभेला तेवढं सोपं नाही; पवारांचे मतभेदाच्या नेमक्या मुद्द्यांवर बोट

शिर्डीतील कार्यक्रमात मोदींनी पवारांवर टीका केली खरी, पण त्यापूर्वी त्यांनी एक वाक्य उच्चारले होते. व्यक्तीगत जीवनात मी त्यांचा आदर करतो, असे म्हटले होते. त्यानंतरच मोदींनी ‘शेतकऱ्यांसाठी पवारांनी काय केले’ असा जाहीर सवाल विचारला होता. त्याला पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तर उत्तर दिले.

या पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्रात मी ज्या ज्या ठिकाणी जातो. त्या त्या ठिकाणच्या लोकांचा मला जो प्रतिसाद मिळतो. याचा रिपोर्ट मोदी यांच्याजवळ गेला असावा. ‘साईबाबांच्या दर्शनाला गेलेल्या नरेंद्र मोदी यांना शरद पवारांच्या दर्शनाची काय आवश्यकता होती?’, असा चिमटा शरद पवार यांनी मोदी यांना काढला.

दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पवारांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी सगळे नेते तणावाखाली होते. त्या पत्रकार परिषदेत पवार यांना राष्ट्रवादीचा तरुण चेहरा कोण असेल, असा सवाल विचारला होता, त्यावेळी एवढ्या टेंन्शनच्या वातावरणातही त्यांनी हजरजबाबीपणे हात वर करून ‘शरद पवार’ असे विधान केले हेाते.

Sharad Pawar-Narendra Modi
Nilavande Water Issue : पंतप्रधानांनी लोकार्पण केलेल्या ‘निळवंडे’च्या पाण्यासाठी खासदारांचा अल्टिमेटम

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना एक ज्येष्ठ नेता पवारसाहेबांसाठी आम्ही असा प्रचार केला, तसा प्रचार केला, असे सांगत होते. पवारांनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख करत ‘तुम्ही प्रचार केल्यानेच आम्ही त्या वेळी निवडून आलो’ अशी त्या ज्येष्ठ नेत्याची फिरकी घेतली होती. त्या वेळी तो नेता चांगलाच खजिल झाला होता.

Sharad Pawar-Narendra Modi
Dharmaraobaba On Ajit Pawar : अजितदादा मुख्यमंत्री होणारच, ‘बाबां’ना आहे पूर्ण खात्री !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com