सर्वोच्च न्यायालयातील 76 वकिलांनी थेट सरन्यायाधीशांना पत्र लिहून केली मोठी मागणी

उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांचाही या वकिलांमध्ये समावेश आहे.
N. V. Ramana

N. V. Ramana

Sarkarnama

Published on
Updated on

नवी दिल्ली : हरिद्वार येथे झालेल्या धर्म संसदेवरून (DharmaSansad) मोठा वाद निर्माण झाला आहे. या संसदेमध्ये काही जणांनी प्रक्षोभक भाषणे केल्याने खळबळ उडाली आहे. अल्पसंख्यांकाविरोधात शस्त्र वापरण्याची भाषा धर्म संसदेत करण्यात आली. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) 76 वकिलांनी थेट सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा (N. V. Ramana) यांच्याकडे दाद मागितली. त्यांना पत्र लिहून वकिलांनी या भाषणांची स्वत:हून दखल घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

धर्म संसद ता. 17 ते 19 डिसेंबर दरम्यान झाली आहे. यामध्ये देशाची संविधानिक मूल्य आणि धार्मिक सौहार्दाचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. पण आयोजक व अशी भाषणे देणाऱयांनी आम्ही काहीच चुकीचे केले नसल्याचा दावा केला जात आहे. त्यावर 76 प्रसिध्द वकिलांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिलं आहे.

<div class="paragraphs"><p>N. V. Ramana</p></div>
खा. कोल्हे रोज भेटणार नाहीत! शरद पवारांनी थेट समोरच सांगून टाकलं...

धर्म संसदेतील भाषणांवर पोलिसांनी कारवाई केलेली नसल्याने त्यामध्ये तातडीने न्यायालयाने हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे पत्रात म्हटले आहे. सध्याच्या स्थितीत अशी कारवाई करणे आवश्यक आहे. दिल्ली आणि हरिद्वारमध्ये झालेल्या धर्म संसदेत केवळ घृणास्पद भाषमेच झाली नाहीत तर एका समुदायाविरोधा नरसंहाराचे खुले आव्हान देण्यात आले. हा भारताची एकता आणि अखंडतेसाठी धोका आहे. तसेच लाखो मुस्लिम नागरिकांचे जीवन संकटात टाकण्याची घटना आहे, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

धर्म संसदेतील भाषणानंतर चार दिवसांपूर्वी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण त्यामध्ये केवळ एकाच व्यक्तीचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आले होते. पण टीका होऊ लागल्यानंतर त्यात धर्म दास आणि साध्वी अन्नपूर्णा यांच्या नावांचा समावेश करण्यात आला. सोशल मीडियातही या भाषणांची निंदा केली जात असून कारवाईची मागणी होत आहे.

<div class="paragraphs"><p>N. V. Ramana</p></div>
सकाळी राणेंसोबत बैठक अन् दुपारी अजितदादा स्टेजवरूनच म्हणाले , महाभाग!

साध्वी अन्नपूर्णा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये साध्वी म्हणतात की, जर तुम्ही त्यांना हटवू इच्छिता तर त्यांना मारून टाका. आपल्याला असे शंभऱ लोक हवे आहेत, जे त्यांच्या 20 लाख लोकांना मारतील, असं भाषणात म्हटलं आहे. पण त्यानंतरही आयोजकांकडून काहीही चूकीचे केले नसल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, या वकिलांमध्ये उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश अंजना प्रकाश (Anjana Prakash) यांच्यासह दुष्यंत दवे (Dushyant Dave), प्रशांत भूषण (Prashant Bhushan), वृंदा ग्रोवर, सलमान खुर्शीद (Salman Khurshid) आदी ज्येष्ठ वकिलांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com