8th Pay Commission आधीच सरकारी अधिकाऱ्यांची लॉटरी! प्रमोशनशिवाय मिळणार हाय-लेव्हल पगार?

Government officers high level salary without promotion : 8वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वीच सरकारी अधिकाऱ्यांना हाय-लेव्हल पगाराचा लाभ मिळणार का? प्रमोशनशिवाय वेतनवाढीबाबत जाणून घ्या महत्त्वाची माहिती.
8th Pay Commission आधीच सरकारी अधिकाऱ्यांची लॉटरी! प्रमोशनशिवाय मिळणार हाय-लेव्हल पगार?
Published on
Updated on

केंद्रीय कर्मचाऱ्यांसह सरकारी अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 8th Pay Commission च्या अंमलबजावणीबाबत चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारने काही अधिकाऱ्यांच्या पगाराशी संबंधित महत्त्वाचा नियम स्पष्ट केला आहे. विशेष म्हणजे, काही अधिकाऱ्यांना नियमित प्रमोशन न मिळालं तरी हाय-लेव्हल पगाराचा आर्थिक लाभ मिळू शकतो. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या पगारवाढीचा हा नियम सध्या चर्चेत आला आहे.

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (Department of Personnel and Training) 26 मे 2026 रोजी Non-Functional Upgradation म्हणजेच NFU संदर्भात Office Memorandum (O.M.) जारी केले. या नियमानुसार Organised Group 'A' Services (OGAS) मधील पात्र अधिकाऱ्यांना काही ठराविक परिस्थितीत नियमित पदोन्नतीशिवाय हाय-लेव्हल पगाराचा लाभ मिळू शकतो.

8th Pay Commission आधीच सरकारी अधिकाऱ्यांची लॉटरी! प्रमोशनशिवाय मिळणार हाय-लेव्हल पगार?
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदींचा वारसदार कोण? राहुल गांधींचा खळबळजनक दावा, एवढा कॉन्फिडन्स आला कुठून?

NFU म्हणजे नेमकं काय?

सरकारी सेवेत पदोन्नती झाल्यानंतर सामान्यतः अधिकाऱ्याचा Pay Level आणि त्यानुसार पगार वाढतो. मात्र Organised Group 'A' Services मधील अधिकाऱ्यांसाठी Non-Functional Upgradation ची विशेष तरतूद आहे. या माध्यमातून त्याच बॅचमधील एखाद्या अधिकाऱ्याला उच्च पदावर प्रमोशन मिळाल्यास, ठराविक अटी पूर्ण करणाऱ्या इतर पात्र अधिकाऱ्यांनाही हाय-लेव्हल पगाराचा आर्थिक लाभ मिळू शकतो.

त्यामुळे 8th Pay Commission येण्यापूर्वीच NFU नियमामुळे पात्र केंद्रीय अधिकाऱ्यांना हाय-लेव्हल पगाराचा फायदा मिळण्याची शक्यता ही महत्त्वाची बाब ठरत आहे. मात्र हा लाभ कोणत्या अधिकाऱ्यांना आणि कोणत्या अटींवर मिळेल, हे संबंधित सेवा नियम आणि पात्रतेवर अवलंबून असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com