

8th Pay Commission News update: आठव्या वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission) संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. TA आणि मुलांच्या शिक्षण भत्त्यात मोठी वाढ करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. शिक्षण भत्ता ₹7,000 पर्यंत आणि TA वाढवण्याचा प्रस्ताव आहे. आता याबाबत केंद्र सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
8th Pay Commission संदर्भात तरतूदीबाबत चर्चांना पुन्हा वेग आला आहे. ट्रान्सपोर्ट अलाउंस (TA) आणि मुलांच्या शिक्षण भत्त्यात वाढ करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून जोरात करण्यात येत आहे. देहरादून येथे नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर या चर्चांना अधिक गती मिळाली आहे. आता दिल्लीतही पुढील बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर Progressive Teachers Justice Forum (PSNM) या संघटनेने काही महत्त्वाचे प्रस्ताव सरकारसमोर मांडले आहेत. सध्या सुमारे 2,800 रुपयांपर्यंत असलेला मुलांच्या शिक्षणाचा भत्ता वाढवून तो 7,000 रुपये प्रतिमहिना करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा भत्ता सध्या 12वीपर्यंत मर्यादित असला, तरी तो पदवीपर्यंत लागू करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. यासोबतच डिजिटल शिक्षणाच्या वाढत्या गरजा लक्षात घेता दरमहा 2,000 रुपयांचा स्वतंत्र भत्ता देण्याचाही प्रस्ताव समोर आला आहे.
याचबरोबर ट्रान्सपोर्ट अलाउंसमध्येही मोठी वाढ करण्याचा मुद्दा पुढे आला आहे. कर्मचारी संघटनांनी TA हा बेसिक पगाराच्या 12 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढवावा किंवा किमान 9,000 रुपये आणि त्यावर महागाई भत्ता (DA) असा निश्चित दर ठेवावा, अशी मागणी केली आहे. सध्या विविध स्तरांनुसार 1,800 ते 7,200 रुपयांपर्यंत TA दिला जातो.
केवळ भत्तेच नव्हे तर रजांबाबतही काही बदल सुचवण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कॅज्युअल लीव्ह, अर्न्ड लीव्ह आणि मेडिकल लीव्हमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. निवृत्तीवेळी मिळणाऱ्या अर्न्ड लीव्ह एन्कॅशमेंटची मर्यादा 300 दिवसांवरून 400 दिवसांपर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रगतिशील शिक्षक न्याय मंच (PSNM) या संघटनेनेही आपल्या महत्त्वाच्या मागण्या आयोगासमोर सादर केल्या आहेत.
या सर्व मागण्यांवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आता केंद्र सरकारकडे असून, त्यांचा निर्णय काय येतो याकडे देशभरातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. जर या प्रस्तावांना मंजुरी मिळाली, तर कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि सुविधांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता असून त्यांच्या आर्थिक स्थितीतही लक्षणीय सुधारणा होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.