Eknath Shinde: मोठी बातमी ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला; मोठ्या घडामोडीचे संकेत

Political News : तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी रात्री अचानक दिल्ली दौरा ठरला आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला असून या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी रात्री अचानक दिल्ली दौरा ठरला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मध्यरात्रीच राजधानी दिल्लीत पोहोचणार आहेत. त्यामुळे, राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आहेत. या दिल्ली दौऱ्यात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्याने त्यावर काही चर्चा होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Eknath Shinde News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक कोणत्या कारणासाठी नियोजित केला आहे, यावरही राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार हे कारण तर नाही ना, अशीची चर्चा सध्या सुरू झाली आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री शिंदे रविवारी रात्री दिल्लीत जाणार असून हा दौरा अचानक ठरला असल्याची माहिती आहे.

त्यांचा दिल्ली दौरा हा महत्त्वाच्या बैठकीसाठी नियोजित करण्यात आल्याचेही सुत्रांनी सांगितले. विधानसभा निवडणुकांना अवघे 3 महिने राहिले असतानाही मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याने मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची अडचण झाली आहे.

Eknath Shinde
Pune Congress: काँग्रेसच्या अंतर्गत बाबी चव्हाट्यावर आणणं चुकीचं; बागवेंशी चर्चा करायला तयार!

दुसरीकडे सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सोमवारी रात्री मराठवाड्यातील आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला, मराठवाड्यात आलेल्या अपयशानंतर देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले आहेत. मराठवाड्यातील विधानसभेच्या भाजपाच्या आमदारांची सागर निवासस्थानी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जात असताना रणनीती सर्वच राजकीय पक्षांकडून आखली जात आहे. त्यातच, मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा बनला असून उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी सत्ताधारी पक्षांविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे, फेक नेरेटीव्ह आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी महायुती प्रयत्नशील आहे.

Eknath Shinde
Ashok Chavan News : अशोक चव्हाणांना घरातूनच धक्का बसण्याची शक्यता; नातलग विधानसभा निवडणूक लढणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com