NDA Meeting : भाजपचा जानकर, खोतांना धक्का; NDAच्या बैठकीचे निमंत्रण नाही, जानकर म्हणाले, ‘मी भीक मागणार नाही...’

Sadabhau Khot Statement: जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि प्रहारचे बच्चू कडू यांना निमंत्रण देण्यात आलेले आहे.
Mahadev Jankar-Sadabhau Khot
Mahadev Jankar-Sadabhau Khot Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भारतीय जनता पक्षाने महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांना आज जोरात धक्का दिला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या आज (ता. १८ जुलै) होणाऱ्या बैठकीला महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती आणि (स्व.) विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामला निमंत्रण दिलेले नाही. दुसरीकडे, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि प्रहारचे बच्चू कडू यांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. (Mahadev Jankar, Sadabhau Khot not invited to NDA meeting)

दरम्यान, एनडीएच्या (NDA) बैठकीचे निमंत्रण न दिल्याने माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी चिडून आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्हाला एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण मिळालेले नाही. आम्ही कोणाकडेही भीक मागायला जाणार नाही. आम्ही स्वाभिामाने आमच्या पक्षाची ताकद वाढवू, त्यामुळे त्यांनी आम्हाला बोलावावं, अशी अपेक्षाच आम्ही ठेवत नाही.

Mahadev Jankar-Sadabhau Khot
Barshi News : बार्शी मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा;फडणवीस समर्थक आमदाराच्या अडचणी वाढणार

राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आज बैठक होत आहे. त्या बैठकीला ३८ पक्ष एकत्र येणार आहेत. मात्र सदाभाऊ खोत, महादेव जानकर आणि मेटे यांना निमंत्रण दिलेले नाही. त्यामुळे महादेव जानकर हे काहीसे संतप्त झाले होते.

Mahadev Jankar-Sadabhau Khot
NCP NEWS : राष्ट्रवादीचं नेतृत्व सुप्रिया सुळे की अजित पवारांकडे असावं?; खासदार कोल्हेंनी दिले हे उत्तर....

जानकर म्हणाले की, मला बैठकीला का बोलावली नाही, हे तुम्ही भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय जे. पी नड्डा यांना विचारलं पाहिजे. विधान परिषदेत मी राष्ट्रीय समाज पक्षाचा, तर विधानसभेतही आमच्या चिन्हावर आमदार आहे. कर्नाटक आणि गुजरात आम्ही महापालिका निवडणुकीत यश मिळविले आहे. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही चांगली मतं घेतली आहेत. पण त्यांनी आम्हाला बोलावलं नाही, त्यामुळे आम्ही कुठं त्यांच्या पाठीशी आम्हाला घ्या म्हणून लागायचे. असं आम्ही कोणाच्याही मागं लागणार नाही.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला आम्हाला बोलावलं नाही. हरकत नाही,आम्ही आमची झोपडी स्वाभिमानाने घेऊन महाराष्ट्र आणि देशभरात तो बंगला कसा होईल, ते पाहणार आहोत. त्यामुळे त्यांनी आम्हाला बोलावं अशी अपेक्षा आम्ही ठेवत नाही. आम्हाला एनडीएत घ्या, असं आम्ही त्यांना बोलणार नाही. भाजपकडून आम्हाला संपर्क करण्यात आलेला नाही, तसेच आम्ही भाजपच्या कोणत्या नेत्याशी संपर्क साधलेला नाही. आम्ही स्वतंत्र लढून आमची ताकद वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही जानकर यांनी स्पष्ट केले.

Mahadev Jankar-Sadabhau Khot
Maharashtra Politic's : राष्ट्रवादी एकसंघ ठेवण्याची पवारांना विनंती; पण त्यांच्या मनात काय?, हे आज कसं सांगू; शरद पवारांच्या भेटीनंतर पटेलांची प्रतिक्रिया

स्वबळावर लढण्याची तयारी : जानकर

आम्ही आता यूपीए आणि एनडीएमध्येही नाही. आम्ही आमची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही भाजपवर नाराज नाही. आम्हाला एनडीएत बोलावं पाहिजे, अशी अपेक्षा ठेवतच नाही. आम्ही जनस्वराज्य यात्रा काढत असून आम्ही महाराष्ट्रात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करत आहोत, असेही जानकर यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com