

Religious Census : देशात धार्मिक जणगणना करण्यात यावी, अशी मागणू भाजप खासदार सुब्रत पाठक यांनी केली आहे. पाठक यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्राद्वारे ही मागणी केली आहे. स्वातंत्र्यानंतर हिंदूंची लोकसंख्या कमी झाली असून मुस्लिमांची लोकसंख्याही वाढली आहे. यात बेकायदेशी घुसखोरी करणाऱ्यांचे प्रमाणही जास्त असल्याने मुस्लिम समाजाची लोकसंख्या वाढल्याचा दावा पाठक यांनी केला आहे.
हिंदू, बौद्ध, मुस्लीम, शीख, जैन आदींची नेमकी संख्या कळण्यासाठी जात जनगणनेपूर्वी धार्मिक जनगणना करण्यात यावी, अशी मागणी सुब्रत पाठक यांनी पत्रात केली आहे. तसेच, मुस्लिमांची लोकसंख्या जास्त असल्याचे आढळल्यास त्यांचा अल्पसंख्याक दर्जा काढून घेण्यात यावा. असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. १९४७ मध्ये भारताची फाळणी झाली तेव्हा अल्पसंख्याकांची लोकसंख्या ७ टक्के होती. यात मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी, जैन पंथाच्या लोकांचा समावेश होता. याशिवाय ९३ टक्के हिंदू होते. ज्यात, खुला, मागास, अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांचा समावेश होता.
आज आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केली असून देशाची लोकसंख्या सुमारे 140 कोटी आहे. या काळात शेजारील देशांतून मोठ्या प्रमाणात रोहिंग्या, बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांनी बेकायदेशीरपणे घुसखोरी केली. या माध्यमातून देशातील धार्मिक लोकसंख्या प्रभावित करण्याचा कट रचून त्यांची मते आणि आधार व्होटबँकेच्या लालसेपोटी येथे प्रवेश केला गेला.कार्ड बनवण्यात आले, असेही सुब्रत पाठक यांनी नमुद केलं आहे.
परदेशी निधी वापरून देशात मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्यात आल्याचा दावाही पाठक यांनी आपल्या पत्रात केला आहे. लव्ह जिहाद, गेम जिहाद यांसारखी प्रकरणे समोर आली आहेत. परिणामी काश्मीर, केरळ, आसाम आणि बंगालसारख्या अनेक राज्यांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. सध्या देशातील 200 हून अधिक जिल्हे मुस्लिम बहुल झाले आहेत. अशा परिस्थितीत जातीच्या जनगणनेपूर्वी धार्मिक लोकसंख्याही जावी म्हणजे एकूण अल्पसंख्याक समाजात मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी यांची संख्या किती आहे हे कळेल. असही सुब्रत पाठक यांनी म्हटलं आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.