Arvind Kejriwal : ' मी उद्या सर्व नेते, आमदारांसह भाजप मुख्यालयात जाणार, अन्...' ; केजरीवालांचा मोठा निर्णय!

Swati Maliwal and Vibhav Kumar News : दिल्ली पोलिसांनी विभव कुमार यांना अटक केली आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama

Aam Aadmi Party News : राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण आणि गैरवर्तन प्रकरणाने नवीन वळण घेतलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी स्वीय सहायक विभव कुमार यांचा जामीन अर्ज फेटाळला गेल्यानंतर, मख्यमंक्षत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठा खुलासा केला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केंजरीवाल(Arvind Kejriwal) म्हणाले, 'तुम्ही पाहू शकता की ते कशाप्रकारे आम आदमी पार्टीच्या मागे लागले आहेत. ते आम्हाला सर्वांना तुरुंगात टाकू इच्छितात. मी पंतप्रधानाना सांगू इच्छितो की तुम्ही हा जेलचा खेळ खेळत आहात. कधी मनीष सिसोदिया, सिंजय सिंह आणि अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकत आहात. उद्या मी आमच्या सर्व वरिष्ठ नेते, आमदारांसह दुपारी 12 वाजता भाजप मुख्यालयात येत आहे. तुम्ही हवं त्याला तुरुंगात टाकू शकतात. केजरीवाल म्हणाले अखेर माझा गुन्हा काय आहे? हे दिल्लीत काम करण्यापासून रोखू इच्छित आहेत.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Arvind Kejriwal
Swati Maliwal Case : केजरीवालांचे पीए विभव कुमार यांना न्यायालयाचा दणका

आम आदमी पक्षाचे(Aam Aadmi Party) नेते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी स्वीय सहायक विभव कुमार यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यांनी अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी दाखल केलेली याचिका तीस हजारी न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकेवर दोन्ही बाजूने सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. दिल्ली पोलिसांनी विभव कुमार यांना अटक केली.

आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल ( Swati Maliwal ) यांना 13 मे रोजी विभव कुमार यांनी मारहाण केली. याप्रकरणी स्वाती मालीवाल यांच्या फिर्यादीवरून विभव कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Arvind Kejriwal
Sex Scandal Case : 'प्रज्ज्वल रेवन्नाचा VIDEO, डीके शिवकुमारांचे नाव अन् तब्बल 100 कोटींचं डील' ; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा!

विभव कुमार यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री अरविंद केंजरीवाल यांनी म्हटले की, मी विचार करत होतो की हे आम्हा सगळ्यांना तुरुंगात का टाकू इच्छित आहे. आमचा गुन्हा काय आहे? आमचा गुन्हा हा आहे की, आम्ही दिल्लीतील गरीब विद्यार्थ्यांसाठी चांगलं शिक्षण दिले. सरकारी शाळा चांगल्या बनवल्या, हे बनवू शकत नाही. म्हणूनच हे दिल्लीतील सरकारी शाळा रोखू इच्छितात. आमचा गुन्हा हा आहे की, आम्ही दिल्लीत मोहल्ला क्लिनिक सुरु केले, सरकारी रुग्णालये बनवली, लोकांसाठी मोफत औषधींची व्यवस्था केली, चांगल्या उपचारांची व्यवस्था केली. हे नाही करू शकले. म्हणूनच ते दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक, रुग्णालये आणि मोफत उपचारांना रोखू इच्छित आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com