AAP MLAs join BJP : दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी 'AAP'ला मोठा झटका; आठ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

BJP Vs APP in Delhi News : आम आदमी पार्टीच्या आठ आमदारांसह अनेक नेत्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
BJP Vs APP
BJP Vs APPSarkarnama
Published on
Updated on

Aam Aadmi Party News : नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी आम आदमी पार्टीला मोठा झटका बसला आहे. आम आदमी पार्टीच्या आठ आमदारांनी आणि काही आजी व माजी नगरसेवकांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीआधी एवढ्या मोठ्यासंख्येत आम आदमी पार्टीचे प्रमुख नेते भाजपमध्ये जाणे हे केजरीवालांसाठी चिंता वाढवणारे नक्कीच ठरू शकते.

कोणी केला भाजपमध्ये प्रवेश? -

पालम मतदारसंघातून दोनवेळा आमदार राहिलेल्या भावना गौर, कस्तुरबा नगर येथून तीनवेळा आमदार झालेले मदनलाल, तीनवेळ आमदार झालेले गिरीश सोनी, दोनवेळा आमदार झालेले राजेश ऋषी, आमदार नरेश यादव, आमदार पवन शर्मा, आमदार रोहित मेहरोलिया, माजी आमदार बिजेंद्र गर्ग, नगसेवक अजय राय

या निमित्त भाजप(BJP) नेते बैजयंत पांडी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, आज ऐतिहासिक दिवस आहे आणि निवडणुकीच्या तीन दिवस आधी एवढ्या मोठ्या संख्येत आमदार, नगरसेक, पदाधिकारी 'आपदा'पासून मुक्त झाले आहेत आणि आता दिल्लीची 'आपदा'मुक्त व्हायची वेळ आहे. सर्वात मोठ्या लोकशाही आणि पारदर्शी पक्षात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे.

BJP Vs APP
PM Modi on Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदींची खास प्रतिक्रिया; निर्मला सीतारामन यांचेही केले कौतुक, म्हणाले...

आपण जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था बनलो आहोत आणि लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनणार आहे. संपूर्ण जग आज आपलं कौतुक करत आहे. अशाप्रकारे देशाची प्रगती होत आहे, सर्वांचा विकास होत आहे. तरूण, महिला आणि समाजातील सर्व वर्ग पुढे जात आहे.

तसेच पांडी यांनी म्हटले की, दिल्ली जशाप्रकारे देशाची राजधानी असायला हवी, आम्ही दिल्लीला तसं करण्याचा प्रयत्न करू. यासाठी दिल्लीत सत्ता परिवर्तन आवश्यक आहे. आम्ही भाजपमध्ये यावर विश्वास ठेवतो की, देश सर्वात आधी, नंतर पक्ष आणि व्यक्ती असतो.

BJP Vs APP
Chhagan Bhujbal on Union Budget 2025: ''हा अर्थसंकल्प...'' ; छगन भुजबळांची केंद्रीय अर्थसंकल्पावर विशेष प्रतिक्रिया!

याशिवाय त्यांनी म्हटले की, असं नाही की हे केवळ निवडणुकीच्यावेळीच होतं. दिल्लीचा विकास करण्यासाठी मोदींची(Narendra Modi) जी गॅरंटी आहे, ती दिल्लीत आणण्याची आज वेळ आली आहे. आपदा खोटं पसरवत आहे, स्वच्छ पाणी, स्वच्छ यमुना करण्याचे वचन दिले होते, परंतु काय झालं? घोटाळ्यांवर घोटाळे झाले. जलबोर्ड, दिल्ली डीटीसी आणि रेशकार्डमध्येही घोटाळा झाला. जेव्हा सर्वसामान्य नागरिक कोवडिच्या चक्रात अडकला होता, तेव्हा त्यांनी(केजरीवाल) शीशमहल बनवला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com