PM Modi on Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदींची खास प्रतिक्रिया; निर्मला सीतारामन यांचेही केले कौतुक, म्हणाले...

Narendra Modi reaction on budget 2025 : यंदाचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा आठवा अर्थसंकल्प होता. त्यांनी एकूण 74 मिनिटं भाषण दिले, जे त्यांचे आतापर्यंतचे दुसरे सर्वात छोटे भाषण होते.
Modi reaction on budget 2025
Modi reaction on budget 2025Sarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi praises the budget : केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. ज्यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे. शिवाय, निर्माला सीतारामन यांचंही कौतुक केलं आहे. मोदी म्हणाले, हा अर्थसंकल्प मध्यवर्गीयांचा खिसा भरले आणि आत्मनिर्भर भारत अभियनास गती देईल.

पंतप्रधान मोदींनी(Narendra Modi) पुढे म्हटले की, आज भारताच्या विकास यात्रेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हा १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांचा अर्थसंकल्प आहे. हा प्रत्येक भारतीयांचे स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प आहे. आम्ही अनेक क्षेत्र युवकांसाठी उघडली आहेत. हा विकास भारताच्या मिशनला गती देणारा अर्थसंकल्प आहे.

Modi reaction on budget 2025
Defense Budget 2025: केंद्र सरकारने वाढवले 'संरक्षण बजेट'; 6,81,210 कोटी रुपयांची तरतूद

तसेच, हा अर्थसंकल्प Force Multiplier आहे. हा आपल्या स्वप्नांना पूर्ण करणारा अर्थसंकल्प आहे. विकसित भारताच्या मिशनला सर्वासामान्य नागरिक चालवणार आहे. हा अर्थसंकल्प बळकटी देणार आहे. गुंतवणूक, उपभोग आणि विकास वाढणारा हा अर्थसंकल्प आहे. असंही मोदी म्हणाले.

याचसोबत केंद्रीय अर्थमंत्री निर्माल सीतारामन(Nirmala Sitharaman) यांचे कौतुक करताना मोदी म्हणाले, मी लोककेंद्रीत अर्थसंकल्प आणल्याबद्दल निर्मला सीतारामन आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो. शक्यतो अर्थसंकल्पाचा फोकस या बाबींवर असतो की सरकारी तिजोरी कशी भरली जाईल, मात्र हा अर्थसंकल्प अतिशय वेगळा आणि याच्या विपरीत आहे. हा अर्थसंकल्प देशाच्या नागरिकांचा खिसा कसा भरेल, नागरिकांची बचत कशी वाढेल आणि देशातील नागरिक विकासचे भागीदार कसे बनतील...याबाबतचा अतिशय भक्कम पाया रचतो आहे.

Modi reaction on budget 2025
Union Budget 2025 : मोदी सरकारसाठी महिला 'लाडक्या', बजेटमध्ये दिलं मोठं गिफ्ट!

यंदाचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा आठवा अर्थसंकल्प होता. त्यांनी एकूण 74 मिनिटं भाषण दिले, जे त्यांचे आतापर्यंतचे दुसरे सर्वात छोटे भाषण होते. याचबरोबर निर्मला सीतारामनी यांनीही हेही सांगितले की, पुढील आठवड्यात आयकर विधेयक सादर केले जाईल आणि हे विधेयक करदात्यांची सुविधा वाढवण्यावर केंद्रीत असेल. आयकराबाबत आधी विश्वास ठेवण्यावर आणि नंतर चौकशी करण्यावर भर दिला जाईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com