Manish Sisodia : सुनीता केजरीवाल यांच्या राजकीय भवितव्यावर सिसोदिया यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

Manish Sisodia on Sunita Kejriwal Political future : मागील आठवड्यातच सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर मनीष सिसोदिया हे तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत.
Manish Sisodia on Sunita Kejriwal
Manish Sisodia on Sunita KejriwalSarkarnama
Published on
Updated on

AAP leader Manish Sisodia : आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी तुरुंगात बंद आपल्या पतीच्या संघर्षाची भावना लोकांपर्यंत पोहचवण्यात अप्रतिम भूमिका बजावली. त्यांनी संकेत दिले की पक्ष प्रमुख केजरीवाल तिहार तुरुंगातून आल्यानंतर त्यांची(सुनीता केजरीवाल) राजकीय भूमिका संपुष्टात येऊ शकते.

अबकारी धोरण प्रकरणात 21 मार्च रोजी केजरीवाल यांच्या अटकेनंतर सुनीता केजरीवाल यांनी त्यांच्या आणि पक्षाच्या दरम्यान एका सेतूचे काम केले आहे. याशिवाय दिल्ली, गुजरात आणि हरियाणामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीच्या(Aam Aadmi Party) प्रचार अभियानातही महत्त्वाची भूमिका निभावली आहे. पीटीआयच्या संपादकांशी चर्चेत सिसोदिया यांनी मीडियामध्ये सुरू असलेल्या त्या चर्चांनाही हसत फेटाळलं, ज्यामध्ये म्हटलं होतं की सुनीता केजरीवाल या मुख्यंत्रिपदाची जबाबादारी सांभाळतील.

Manish Sisodia on Sunita Kejriwal
Independence Day : ना आतिशी, ना सिसोदिया ‘या’ नेत्याला ध्वजारोहणाचा मान; राज्यपालांकडून नाव फायनल...

मनीष सिसोदिया(Manish Sisodia) यांना मागील 26 फेब्रवारी रोजी अबकारी धोरण प्रकरणी अटक केली होती. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर ते तिहार तुरुंगातून बाहेर आले. सिसोदिया यांनी म्हटले की, आम आदमी पार्टीचे नेते म्हणून ते तुरुंगात असूनही हे जाणून होते की पक्ष कशाप्रकारे काम करत आहे आणि केजरीवाल यांच्या अटकेनंतरग प्रत्यक्षात काय होणार आहे?

त्यांनी म्हटले की, टीव्ही बघून असं वाटत होतं की, संपूर्ण पक्ष संपला आहे. सर्व नेते उपेक्षित आहेत आणि केवळ सुनीता केजरीवालच मुख्यमंत्री बनणार आहेत आणि आता केवळ त्यांचा शपथविधी बाकी आहे. मी असं यामुळे म्हणत आहे की, भविष्यवाणी अशाप्रकारेच केली जाते.

Manish Sisodia on Sunita Kejriwal
Baba Bageshwar News : 'वंदे मातरम् म्हणण्यात अडचण असणाऱ्यांनी..' ; बाबा बागेश्वर यांचं मोठं विधान!

सुनीता केजरीवाल(Sunita Kejriwal) यांची सुशिक्षत, सुसंस्कृत आणि अनुभवी महिला म्हणून स्तुती करत सिसोदिया यांनी म्हटले की, संकट काळात पक्षाला त्यांचा गरज होती. त्यांनी असेही म्हटले की, अशावेळी जेव्हा त्यांचे पती तुरुंगात होते. तेव्हा पक्षाला अशा व्यक्तीची गरज होती जो लोकांपर्यंत पोहचू शकेल आणि त्या अरविंद केजरीवाल यांचा विश्वासहार्य, भावनात्मक आवाज बनल्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com