Sunita Kejriwal : सुनीता केजरीवालांना हायकोर्टाचा दणका! 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्याचे आदेश

Sunita kejriwal delhi high court notice : अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी अटक केल्यानंतर त्यांनी न्यायालयात स्वःताच युक्तीवाद केला होता
Sunita Kejriwal
Sunita Kejriwalsarkarnama

Sunita Kejriwal : अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. अरविंद केजरीवाल यांचा न्यायालयातील सुनावणी दरम्यानचा व्हिडिओ सुनीता यांना सोशल मीडियावरून हटवण्याचे आदेश दिल्ली न्यायालयाने दिले आहेत.

अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी अटक केल्यानंतर त्यांनी न्यायालयात स्वःताच युक्तीवाद केला होता. तो व्हिडिओ सुनीता यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊटंवर शेअर केला होता. या प्रकरणी सुनीता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची याचिका न्यायालयात करण्यात आली आहे.

न्यायालयाने सुनीता केजरीवाल Sunita Kejriwal, ट्विटर, मेटा आणि यूट्यूब या सोशल मीडिया कंपन्यांसह पाच जणांना नोटीस बजावून उत्तरे मागितली आहेत. तसेच हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. वकील वैभव सिंग यांनी या प्रकरणी न्यायालयात याचिका केली आहे.

Sunita Kejriwal
Jagan Mohan Reddy News: निवडणुकीत दारुण पराभव, माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींना आणखी एक धक्का; थेट बुलडोझर कारवाई...

सिंग यांनी केलेल्या याचिके प्रमाणे मार्च महिन्यात अरविंद केजरीवाल Arvind kejriwal यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली. या अटकेनंतर अरविंद केजरीवाल स्वत: न्यायालयात आपली बाजू मांडली. सुनीता केजरीवाल यांनी न्यायालयीन कामकाजाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले.

न्यायालयाचे कामकाजाचे व्हिडिओ चित्रण करून ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करणे यावर , 'दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नियमानुसार बंदी आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 जुलैला होणार आहे.

Sunita Kejriwal
Nitish Kumar : सर्वात मोठी बातमी! बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com