Manish Sisodia : जेलमधून सुटताच सिसोदियांनी घेतली केजरीवालांची जागा; बड्या नेत्यांशी गुफ्तगू

AAP Delhi Politics Delhi Liquor Policy Scam Case : दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाने नुकताच जामीन मंजूर केला आहे.
Manish Sisodia, Arvind Kejriwal
Manish Sisodia, Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी जवळपास 17 महिने जेलमध्ये असलेले मनीष सिसोदिया बाहेर आले आहेत. त्यानंतर 24 तासांतच त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची जागा घेतली आहे. पक्षातील बड्या नेत्यांच्या बैठका घेण्यास त्यांनी सुरूवात केली आहे.

केजरीवाल आणि सिसोदिया हे दोन्ही बडे नेते जेलमध्ये असल्याने आपचा कणा मोडला होता. लोकसभा निवडणूक काळात केजरीवालांना अंतरिम जामीन मिळाल्याने पक्षाच्या प्रचार रंगत आली. पण त्यांना पुन्हा जेलमध्ये जावे लागले. त्यानंतर काही दिवसांतच सिसोदियांना नियमित जामीन मंजूर झाला आणि पक्षाच्या जीवात जीव आला.

Manish Sisodia, Arvind Kejriwal
Jagdeep Dhankhad : विरोधकांनी कितीही आदळआपट केली तरी धनखड सुरक्षित; 3 सप्टेंबरनंतर भाजप बहुमतात...

सिसोदिया हे केजरीवाल यांच्यानंतरचे पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. ते दिल्लीचे उपमुख्यमंत्रिही होते. अटक झाल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांना जामीन मंजूर होताच देशभरातील आपच्या पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटले. त्यावरून त्यांच्या बाहेर येण्याला महत्व असल्याचे मानले जाते.

पक्षाला पुन्हा अच्छे दिन आणण्यासाठी सिसोदिया यांनी काम सुरू केले आहे. त्यांनी रविवारी पक्षातील बड्या नेत्यांची आपल्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे. यापूर्वी केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालीच पक्षातील सर्व निर्णय घेतले जात होते. आता सिसोदियांनी सूत्रे हाती घेतली आहेत. सिसोदिया हे विधानसभेचे सदस्य असल्याने पुन्हा मंत्रिमंडळात येणार का, यावरून चर्चेला उधाण आले आहे. सरकारमधून बाहेर राहत पक्षाची घडी बसवण्यावरही ते भर देऊ शकतात, असेही जाणकारांचे मत आहे.

Manish Sisodia, Arvind Kejriwal
Sandeep Valmiki : भाजपवर मोठी नामुष्की; पक्षात प्रवेश केलेल्या माजी मंत्र्याला तीन तासांतच बाहेरचा रस्ता

विधानसभेची तयारी

पुढील वर्षी दिल्लीत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याचीच जबाबदारी पक्षाकडून त्यांच्या खांद्यावर टाकली जाऊ शकते. केजरीवालांना जामीन कधी मिळणार, हे अनिश्चित आहे. त्यामुळे सध्यातरी सिसोदिया यांना पक्षाची कमान सांभाळून सरकारच्या कामावरही लक्ष द्यावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी भाजपने कंबर कसली असून आपला घेरले जात आहे. हा चक्रव्यूह भेदण्यासाठी सिसोदिया यांना रणनीती तयार करावी लागणार आहे. केजरीवालांच्या अनुपस्थितीत त्यांनी ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com