Sandeep Valmiki : भाजपवर मोठी नामुष्की; पक्षात प्रवेश केलेल्या माजी मंत्र्याला तीन तासांतच बाहेरचा रस्ता

BJP AAP Haryana : संदीप वाल्मिकी हे दिल्लीतील केजरीवाल सरकारमध्ये मंत्री होते. काही महिन्यांपूर्वीच ते आपमधून बाहेर पडले आहेत.
Sandeep Valmiki
Sandeep ValmikiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून इतर पक्षातील नेत्यांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. भाजपचा असाच एक प्रयत्न शनिवारी फसला आणि पक्षावर मोठी नामुष्की ओढवली.

आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारमधील माजी मंत्री संदीप वाल्मिकी यांनी शनिवारी मोठा गाजावाजा करत प्रवेश केला. हरियाणातील पंचकूला येथे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या उपस्थित वाल्मिकींना प्रवेश देण्यात आला. पण तीन तासांतच त्यांना पक्षातून काढूनही टाकण्यात आले.

Sandeep Valmiki
Hindenburg Report : ‘हिंडनबर्ग’च्या बॉम्बनंतर अदानींनी ‘सेबी’ प्रमुखांशी कनेक्शनचा केला खुलासा...

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री सैनी यांनी वाल्मिकी यांनी फेटा बांधून पक्षात स्वागत केले. हा फोटो व्हायरल होऊ लागल्यानंतर वाल्मिकी यांच्याविषयी काही जुन्या प्रकरणांची माहितीही सोशल मीडियात व्हायरल होऊ लागले. त्यानंतर भाजपमध्येही हालचाली वाढल्या आणि तीन तासांतच पक्षाला पत्रक काढून वाल्मिकी यांच्याविषयी खुलासा करावा लागला.

भाजपचे प्रदेश महामंत्री सुरेंद्र पुनिया यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दिल्लीचे माजी मंत्री संदीप वाल्मिकी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण त्यांनी आपली पार्श्वभूमी लपवून ठेवली. सत्य समोर येताच भाजपने त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे. त्यांचा भविष्यात पक्षाशी कसलाही संबंध नसेल.

Sandeep Valmiki
Jagdeep Dhankhad : विरोधकांची थेट उपराष्ट्रपतींच्या विरोधातच मोट; एनडीए सरकारला पहिला धक्का बसणार?

संदीप वाल्मिकी यांना शनिवारी रात्र आठ वाजता भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. त्यानंतर अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे पत्रक भाजपला काढावे लागले. वाल्मिकी हे केजरीवाल सरकारमध्ये महिला व बाल विकास मंत्री होते. 2016 मध्ये रेशनकार्ड प्रकरणात एका महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून आण पक्षातूनही काढून टाकण्यात आले होते. ते मुळचे सोनीपत येथील आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com