Assembly Election News : मध्य प्रदेश अन् छत्तीसगडमध्ये 'आप' कुणाचे टेन्शन वाढवणार; पहिली उमेदवारी यादी जाहीर

Madhya Pradesh Election News : या निवडणुकीत 'आप'ने उडी घेतल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असल्याचे बोलले जात आहे.
AAP News
AAP NewsSarkarnama
Published on
Updated on

AAP Candidate List : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. आम आदमी पार्टीनेही मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी 10 उमेदवारांची घोषणा केली. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) जोरदार टक्कर आहे. त्यातच आता 'आप'ने उडी घेतल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असल्याचे बोलले जात आहे.

मध्य प्रदेशसाठी जाहीर केलेल्या यादीत आम आदमी पक्षाने भोपाळ, गोविंदपुरा आणि हुजूर, सेवदा, दिमनी, मुरैना, पेटलावाड, सिरमौर, सिरोंज, चुरहट आणि महाराजपूर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहेत. दुसरीकडे छत्तीसगडसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीत दंतेवाडा, नारायणपूर, अकाईत्रा, भानुप्रतापपूर, कोरबा, राजीम, पथलगाव, कावर्धा, भाटगाव आणि कुंकुरी या जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

AAP News
MLA disqualification case : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात मोठी अपडेट ; १४ सप्टेंबरला विधानसभा अध्यक्षांकडे होणार सुनावणी

आम आदमी पक्षाने मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) पक्षाचे उपाध्यक्ष आयएस मौर्य यांना विदिशामधील सिरोंजमधून तिकीट दिले आहे. याशिवाय पक्षाने भोपाळच्या गोविंदपुरा मतदारसंघातून सज्जन सिंग परमार, हुजूरमधून डॉ. रविकांत द्विवेदी, चुरहटमधून अनेंद्र गोविंद मिश्रा, सेवदामधून संजय दुबे, सिरमौरमधून सरिता पांडे, महाराजपूरमधून रामजी पटेल, पेटलावाडमधून कोमल डामोर, मोरेना येथून रमेश उपाध्ये आणि डिमनी येथून सुरेंद्रसिंग तोमर यांना तिकीट दिले आहे.

AAP News
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा राजस्थानमध्ये काँग्रेसला धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेनेत प्रवेश

छत्तीसगड (Chhattisgarh) प्रदेशाध्यक्ष कोमल हुपेंडी यांना कांकेरमधील भानुप्रतापपूरमधून उमेदवारी दिली आहे. याशिवाय पक्षाने दंतेवाडामधून बाळूराम भवानी, नारायणपूरमधून नरेंद्र कुमार नाग, अकैतारामधून आनंद प्रकाश मिरी, कोरबामधून विशाल केळकर, राजीममधून तेजराम विद्रोही, पाथलगावमधून राजाराम लाक्रा, कावर्धामधून खडगराज सिंग, भाटगावमधून सुरेंद्र गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे. कुंकुरी येथून लिओ मिन्झ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com