Shivsena : मनिषा कायंदेंवरच्या आरोपानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक : शेवाळेंविरूद्ध रस्त्यावर!

Manisha Kayande : 'एक तरफ है घरवाली, एक तरफ बाहरवाली,' असे फलक घेऊन ठाकरे गट रस्त्यावर उतरले आहे.
Manisha Kayande, Rahul Shewale
Manisha Kayande, Rahul Shewalesarkarnama

Shivsena : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. यामध्ये त्यांनी आमदाराला धमकी व ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप केला होता. यासंबंधित त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित चौकशीची मागणीही केली होती. यामुळे आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. राहुल शेवाळेंविरोधक शिवसेना रस्त्यावर उतरली आहे.

मनिषा कायंदे यांच्यावर शेवाळे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. यामुळे आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाली आहे. शेवाळे यांच्याविरोधात ठाकरे गट रस्त्यावर उतरली आहे. पोस्टर घेऊन व जोरदार घोषणाबाजी करत आता ठाकरे गट शेवाळेंचा विरोध करत आहे. 'एक तरफ है घरवाली, एक तरफ बाहरवाली' अशा आशयाचे फलक घेऊन ठाकरे गटाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. राहुल शेवाळे विरोधात ठाकरे गट शिवसेना भवन समोर आंदोलन करत आहे.

Manisha Kayande, Rahul Shewale
Rahul Shewale : राहुल शेवाळेंचा लेटरबाँम्ब : मनिषा कायंदेंकडून ब्लॅकमेलिंग ?

राहुल शेवाळेंनी कायंदेंवर काय केले होते आरोप?

शेवाळे यांनी कायंदे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत.शेवाळेंनी आरोप केलेलं हे प्रकरण २०११ मधील आहे. शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले आहे.या पत्रात गंभीर आरोप केले आहेत. मनिषा कायंदे यांच्याकडून एका माजी आमदाराला ब्लॅकमेलिंग करण्यात आल्याचा आरोप शेवाळेंनी केला आहे. एका गुंडाच्या मार्फेत कायंदे यांनी धमकी दिल्याचा आरोप शेवाळेंनी केला आहे. या पूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी शेवाळे यांनी फडणवीसांकडे केली आहे.

मनिषा कायंदे यांनी माजी आमदाराकडे खंडणी मागितल्याचा आरोपही शेवाळे यांनी केला आहे. डी. के. रावमार्फत या धमक्या दिल्याचे शेवाळे यांनी म्हटलं आहे. एका ज्येष्ठ नेत्यासोबत २००७ मध्ये लग्न करुनही २०११ साली लैंगिक शोषणाचा आरोप केला आणि संबंधित नेत्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप खासदार शेवाळे यांनी फडणवीसांनालिहिलेल्या पत्रातून केला आहे.

घर, वडिलांचा दवाखाना आणि दुकानांचं फर्निचर कायंदे यांनी ज्येष्ठ नेत्याकडून करुन घेतल्याचा आरोप शेवाळेंनी पत्रात केला आहे. फडणवीसांना लिहिलेल्या पत्रानंतर कायंदेंची चौकशी होणार का, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com