केजरीवालांची पाठ फिरताच भाजपने 'आप'ला दिला मोठा दणका; 150 जणांची सोडचिठ्ठी

पंजाबमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाचा विश्वास दुणावला आहे. आता या पक्षानं अन्य राज्यातही हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे.
Gujarat AAP Leaders Joins BJP, Gujrat AAP News
Gujarat AAP Leaders Joins BJP, Gujrat AAP News Sarkarnama

अहमदाबाद : पंजाबमध्ये (Punjab) ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाचा (AAP) विश्वास दुणावला आहे. आता या पक्षानं अन्य राज्यातही हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. पुढील काही महिन्यांत गुजरातमध्ये (Gujarat) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तयारीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी नुकताच दौरा केला. पण त्यांची पाठ फिरताच पक्षाच्या सुमारे 150 पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षाला मोठा झटका बसला आहे. (Gujarat AAP Leaders Joins BJP News)

केजरीवाल आणि मान यांनी गुजरातमध्ये दोन दिवसांत रोड शो आणि विविध स्थानिक मंदिरांना भेटी दिल्या. साबरमती आश्रमाला भेट देत त्यांनी चरखाही चालवला. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या. मागील वर्षी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला अनपेक्षित यश मिळालं आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने जोर लावला आहे. त्यासाठी दोन्ही मुख्यमंत्री गुजरातमध्ये दाखल झाले होते.

Gujarat AAP Leaders Joins BJP, Gujrat AAP News
दोन नाईकांमुळे भाजपच्या महाडिक-देशमुखांसमोर तगडं आव्हान

दोघेही रविवारी सायंकाळी गुजरातमधून परतल्यानंतर आपचे सुमारे 150 नेते व कार्यकर्त्यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाच्या गांधीनगर येथील कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला. यावेळी काँग्रेसलाही मोठा धक्का बसला असून अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडत भाजपला जवळ केलं. भाजपकडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

गुजरात भाजपचे सरचिटणीस प्रदीपसिंह वाघेला यांनी या पक्षप्रवेशानंतर केजरीवालांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, दिल्ली आणि पंजाबचे मुख्यमंत्री घरीही पोहचले नसतील, त्यांचे जेवणही झाले नसेल, त्याआधीच त्यांच्या पक्षातील अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गुजरातमधील लोकांना ते मुर्ख बनवू शकत नाही, हेच यावरून दिसते. त्यांच्या भेटीतून गुजरातला काहीच मिळणार नाही. गुजराच्या जनतेचा भाजपवर विश्वास आहे. पंजाबमध्ये आपची सत्ता आल्यानंतर पाच दिवसांत तेथील शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला.

Gujarat AAP Leaders Joins BJP, Gujrat AAP News
रुग्णालयातून परतताच सीबीआयनं देशमुखांच्या अडचणी वाढवल्या!

आप अन् भाजप आमनेसामने

पंजाबमध्ये सत्ता मिळाल्यानंतर आपने जोरदार खेळी खेळली होती. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विधानसभेत चंडीगड (Chandigadh) त्वरित पंजाबला (Panjab) हस्तांतरित करण्याची मागणी करणारा ठराव मांडला होता. आता यावर भाजपने (BJP) प्रतिडाव टाकला आहे. हरियानातील भाजप सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन घेऊन मोठे पाऊल उचलले आहे. हरियाना सरकारने एक दिवसाचे अधिवेशन बोलावून चंडीगडबाबत ठराव संमत केला आहे. चंडीगड हरियानामध्येच राहावे, असा हा ठराव मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारने मंजूर केला आहे.

केंद्र सरकारने सध्याचे संतुलन आणि सलोखा बिघडेस, असे कोणतेही पाऊल चंडीगडबाबत उचलू नये. पंजाबच्या पुनर्रचनेबाबतचे सर्व प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत यावर निर्णय घेऊ नये. पंजाब विधानसभेने नुकताच संमत केलेला ठरवा हा पंजाब पुनर्रचना कायदा 1966 चे उल्लंघन करणारा आहे. पंजाबने चंडीगडवर सांगितलेला दावा हा या कायद्याच्या उलट आहे, असे या ठरावात म्हटले आहे. त्यामुळे आता पंजाबमधील आप आणि हरयाणातील भाजपचे मुख्यमंत्री आमनेसामने आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com