AAP MP split news : 'आप'चे 10 पैकी 7 खासदार फुटले; कोण तिघे केजरीवालांसोबत एकनिष्ठ? एकजण सर्वांना पुरून उरणारा, वाचा सर्वांची हिस्ट्री...

Arvind Kejriwal MPs support : राघव चड्ढा यांच्यासह राजेंद्र गुप्ता, अशोक मित्तल, संदीप पाठक आणि हरभजन सिंग या खासदारांची राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत एप्रिल २०२८ मध्ये संपणार आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

AAP internal crisis : आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील दहा पैकी सात खासदारांनी बंड केले आहे. अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी स्वतंत्र गट केला असून तो भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. सात खासदार गेले असले तरी अजून तीन खासदार त्यांच्यासोबत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेतून उपनेतेपदावरून हटविल्यापासून त्यांच्या पक्षासोबतचे संबंध ताणले गेले होते. त्याचवेळी त्यांनी आपमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पण ते आपल्यासोबत पक्षाच्या इतर सहा खासदारांनाही घेऊन गेले आहेत.

चड्ढा यांच्यासह अशोक मित्तल, संदीप पाठक, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम सहानी आणि राजेंद्र गुप्ता या खासदारांनीही आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तर संजय सिंह, संत बलबीर सिंग आणि नरेन दास गुप्ता हे तिघे अजूनही केजरीवालांसोबत आहेत. संजय सिंह हे अत्यंत आक्रमक नेते मानले जातात. राज्यसभेतील त्यांची भाषणे सत्ताधारी पक्षावर आसुड ओढणारी असतात. त्यामुळे केजरीवालांसाठी अजूनही त्यांच्यासारखा नेता असल्याने काही दिलासा मिळाला आहे.

Arvind Kejriwal
Raghav Chadha revolt : ‘आप’मध्ये सर्वात मोठी फूट; अखेर राघव चड्ढा यांचे केजरीवालांना हादरवणारे बंड, सात खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, चड्ढा यांच्यासह राजेंद्र गुप्ता, अशोक मित्तल, संदीप पाठक आणि हरभजन सिंग या खासदारांची राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत एप्रिल २०२८ मध्ये संपणार आहे. तर स्वाती मालीवाल या २७ जानेवारी २०२३ पर्यंत राज्यसभेच्या सदस्य असतील. या सर्वांची ही पहिलीच टर्म आहे. तर विक्रम सहानी यांची टर्म ४ जुलै २०२८ पर्यंत आहे. तेही पहिल्यांदाच खासदार झाले आहेत.

Arvind Kejriwal
Financial crisis government : निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी मंत्री, आमदारांच्या वेतनात कपात; महाराष्ट्रात पेन्शनसाठी आंदोलन सुरू असतानाच ‘या’ सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मालीवाल वगळता हे सर्वजण पंजाबचे प्रतिनिधित्व करतात. दिल्लीचे प्रतिनिधित्व करणारे संजय सिंह आणि नरेन दास गुप्ता यांची ही दुसरी टर्म आहे. तेही २७ जानेवारी २०३० पर्यंत खासदार असतील. पंजाबमधील संत बलबीर सिंग हे ४ जुलै २०२८ पर्यंत आपचे राज्यसभेतील सदस्य असतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com