Rishi Sunak News : ऋषी सुनक यांच्या पक्षात मोठी उलथापालथ; पराभवाच्या भीतीने 78 खासदारांचे राजीनामे

General Election in UK : ब्रिटनमध्ये चार जुलैला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. सुनक यांच्याकडून पराभवाच्या भीतीने काही महिने आधाची निवडणूक घेतली जात असल्याची जोरदार चर्चा आहे.
Rishi Sunak
Rishi SunakSarkarnama

London News : ब्रिटनचे भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak News) यांनी नुकतीच सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार चार जुलैही निवडणूक होणार असली तरी सुनक यांच्यासाठी ही मोठी परीक्षा ठरणार आहे. ही निवडणूक प्रत्यक्षात वर्षअखेरीस होणे अपेक्षित होते. पण वेळेआधीच निवडणूक जाहीर करून सुनक यांनी राजकीय अगतिकता दाखवल्याची चर्चा आहे. पण त्यामागचे कारणही तसेच आहे. त्यांच्या हुजूर पक्षाच्या तब्बल 78 खासदारांनी आतापर्यंत राजीनामे दिले आहे. पक्षांतर्गत तसेच नागरिकांमध्ये असलेल्या नाराजीमुळे निवडणूक पक्षाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो, या भीतीने राजीनामा सत्र सुरू आहे. (General Election in UK)

सुनक यांच्या मंत्रिमंडळात (Cabinet) मिशेल गोव्ह आणि अँर्डिया लीडसम यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. तसेच निवडणूक लढणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. माजी पंतप्रधानांसह (Prime Minister) माजी संरक्षण मंत्र्यांनीही निवडणूकीतून माघार घेत हुजूर पक्षाला दणका दिला आहे. आतापर्यंत पक्षाच्या 78 खासदारांनी राजीनामा दिल्याने हुजूर पक्षासमोर निवडणुकीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. (Rishi Sunak Latest News)

Rishi Sunak
Loksabha Election Voting : सहाव्या टप्प्यात पाच वाजेपर्यंत 57.7 टक्के मतदान; अनंतनाग-राजौरीत 'रेकॉर्ड ब्रेक'

हुजूर पक्ष (Conservative Party) मागील चौदा वर्षांपासून सत्तेत आहे. विद्यमान संसदेचा (Parliament) कार्यकाळा जानेवारी 2025 पर्यंत होता. पण काही दिवसांपूर्वीच झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये मिळालेले अपयश, घसरलेली अर्थव्यवस्था, महागाई आदी कारणांमुळे हुजूर पक्षात नाराजी आहे. नागरिकांमध्येही सरकारविरोधात मोठी नाराजी असल्याचे विविध जनमत चाचण्यांमध्ये समोर आले आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाचे (Labour Party) पारडे जड दिसत आहे. हुजूर पक्ष या चाचण्यांमध्ये खूप पिछाडीवर पडला आहे. त्यामुळे सुनक यांनी मध्यावधी निवडणूक जाहीर करत प्रमुख विरोधत असलेल्या केअर स्टार्मर यांच्यासमोर अडचणी निर्माण केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

ब्रिटनमध्ये डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत हुजूर पक्षाने बहुमत मिळत सत्ता स्थापन केली होती. हुजूर पक्षातील अंतर्गत घडामोडीनंतर 44 वर्षीय सुनक यांनी 2022 मध्ये पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतली. अलीकडच्या काळातील ते सर्वात तरूण पंतप्रधान ठरले. केवळ दोन वर्षांतच त्यांच्यासमोर पुन्हा सत्तेत येण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

Rishi Sunak
West Bengal Politics : काँग्रेसमध्ये प्रेम, भाजपमध्ये घटस्फोट; मतपेटीत कैद झाले पूर्वीश्रमीच्या पती-पत्नीचे भविष्य...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com