Justin Trudeau: भारतासोबतची दुश्मनी नडली, पंतप्रधानपद गमावलेल्या ट्रुडोंनी पंधरा दिवसांच्या आतच घेतला दुसरा मोठा निर्णय

Canada Politics : एकीकडे जगातले रशिया,अमेरिकेसारखे बलाढ्य देश भारताशी जुळवुन घेण्याच्या तयारीत असताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रु़डो यांनी थेट पंगा घेतला होता. तोच त्यांना चांगलाच महागात पडला होता.
Justin Trudeau News
Justin Trudeau News Sarkarnama
Published on
Updated on

Justin trudeau News : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin trudeau) यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा 6 जानेवारी केली होती. 2015 पासून त्यांनी कॅनडाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळतानाच तिथली सत्ता ताब्यात ठेवली होती. पण नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कॅनडाला मोठ्या राजकीय भूकंपाचे धक्के बसले आहेत.

जस्टिन ट्रूडो यांनी पंतप्रधानपद सोडण्याची घोषणा केली. त्यांनी याहीपुढे जात आता लवकरच ट्रूडो राजकीय जीवनातला सर्वात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ट्रूडो आहेत. त्यांना काही महिन्यांपूर्वी भारतासोबतच (India) घेतलेली दुश्मनी महागात पडल्याची चर्चा आहे.

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी काही दिवसांतच मोठा धक्का दिला आहे. पंतप्रधानपद सोडण्याची घोषणा करुन पंधरा दिवसही होत नाही, तोच त्यांनी आता त्यांनी राजकारणातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. कॅनडातील आगामी सार्वत्रिक निवडणुका ट्रडो लढवणार नाहीत आणि राजकारणही सोडण्याची दाट शक्यता आहे. हा सत्ताधारी लिबरल पार्टी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Justin Trudeau News
Congress Politics : पूजास्थळे कायद्यावरून वाद सुरू असतानाच काँग्रेसचं मोठं पाऊल; सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला...

कॅनडातील सत्ताधारी लिबरल पार्टी पक्षाकडून नेता निवडण्यात आल्यानंतर पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची 10 वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे.2015मध्ये कंजर्वेटिव्ह पार्टीचे सरकार पडल्यानंतर पंतप्रधान बनले होते.जवळपास दहा वर्षे ट्रूडो यांनी पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळली. सुरुवातीचा काळ त्यांनी चांगलाच गाजवला होता.पण गेल्या काही वर्षांत त्यांची लोकप्रियता घसरली होती.भारतासोबत त्यांचे संबंध बिघडल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होत होती.

लिबरल पार्टी सरकारविरोधात जनतेत तीव्र संतापाची लाट असल्याची चर्चा आहे. त्याचमुळे ट्रुडो यांनी हे पद आणि राजकारण सोडण्याचा निर्णयही घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कॅनडात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे जगातल्या बलाढ्य देश भारताशी जुळवुन घेण्याच्या तयारीत असताना ट्रु़डो यांनी थेट पंगा घेतला होता.तोच त्यांना चांगलाच महागात पडला होता.

Justin Trudeau News
Nanded Congress News : भोकरमध्ये काँग्रेस फुटली; पण पदाधिकाऱ्यांचा ओढा भाजपऐवजी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे!

कॅनडाच्या ग्लोबल न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.त्यात " आगामी निवडणुक पंतप्रधान जस्टिन ट्रुडो लढणार नाहीत,असा दावा करण्यात आला आहे. तसेच त्यांनी आपण पुढे काय करणार आहोत,तसेच त्याबाबतचा विचार करण्यासाठीही आपल्याकडे अधिकचा वेळ नसल्याचंही ट्रुडो यांनी म्हटल्याचं समोर आलं आहे. पण ते काम करण्यावर आपण पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं असून कॅनेडियन लोकांकडून माझी असामान्य कार्यासाठी महत्त्वाच्या टप्प्यांवर निवड झाली आहे, ते आपण करत असल्याचंही ट्रुडो यांनी सांगितलं आहे.

ट्रुडो म्हणाले, आपल्या कॅनडा देशात कायमच जास्त प्रमाणात राजकारण सुरु असते. मात्र,देशहितासाठी कधी काम करायचं आणि लोकांना काय पाहायचं आहे, हे जाणून घेणं,प्रत्येकासाठी खरोखरच महत्त्वाचं आहे,असंही यांनी सांगितलं.

Justin Trudeau News
Andhra Pradesh Government : निवडणूक लढवायची? तर मग तुम्हाला दोनपेक्षा जास्त मुलं हवीत ; आंध्रप्रदेशात लागू होणार अजब नियम!

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या उपस्थितीत अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी समन्वय साधण्याच्या दृष्टीनं ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. यात ट्रुडो यांनी महत्त्वाच्या भेटीगाठी घेतल्या. त्यात कॅनेडियन प्रांतांचे पंतप्रधान,राजदूत आणि काही संघीय कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com