

Sanjay Singh: अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या देणगी घोटाळ्यानं संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. हे प्रकरण इतकं अंगावर आलं आहे की, त्यासाठी राम जन्मभूमी न्यासाचे विश्वस्त अनिल मिश्रा आणि महासचिव चंपत राय यांना राजीनामा द्यावा लागला आहे. तर त्यांच्या ८ सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरणं हजारो कोटींच्या घोटाळ्याचं असल्यानं आता विशेष तपास पथकाच्या तपासात काय काय गोष्टी समोर येतात हे पाहावं लागणार आहे. या संपूर्ण घोटाळ्याचा पर्दाफाश आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केला आहे. याची इनसाईट स्टोरी पाहुयात.
राम मंदिर देणगी घोटाळा सुरुवातीला राम जन्मभूमी न्यासात काम करणाऱ्या महिपाल सिंह या मुख्य लेखापालनं वाचा फोडली. न्यासाकडं आलेल्या देणग्यांमध्ये (रोख रक्कम, सोने-चांदी) गैरव्यवहार, कमी नोंदणी, मौल्यवान वस्तू गायब झाल्याचे मुद्दे उपस्थित केले होते. याबाबतची तक्रार त्यांनी न्यासाचे महासचिव चंपत राय यांच्याकडं केली होती. पण या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेण्याऐवजी महिपाल सिंह यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं. पण सिंह यांच्या आरोपांमुळं या प्रकरणाची आंतरिक चौकशी सुरु झाली आणि पुढे SIT च्या तपासालाही गती मिळाली. म्हणून याप्रकरणात महिपाल सिंह हे मुख्य जागल्या ठरले आहेत.
यानंतर सार्वजनिक स्तरावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हे प्रकरण उचलून धरलं. अखिलेश यादव यांनी ट्विटरवर पोस्ट करून राम मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या देणग्या गायब झाल्याचे आरोप केले होते. सुरुवातीला अखिलेश यादव यांच्या आरोपांकडंही अनेकांनी दुर्लक्ष केलं. पण हळूहळू त्यांच्या या ट्विटमुळे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले, राजकीय वाद वाढला आणि उत्तर प्रदेश सरकारने याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची घोषणा केली.
या प्रकरणानंतर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी छुप्या कॅमेऱ्यांद्वारे काही कर्मचाऱ्यांना देणगीतली रोख रक्कम आणि दागिने चोरताना रंगहाथ पकडलं. याआधारे एसआयटीनं ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटकही केली. या अटक झालेल्यांमध्ये चंपतराय यांच्या जवळचे लोकांचा समावेश आहे. त्यामुळं सहाजिकच चंपतराय यांनाही राजीनामा देणं भाग पडलं आहे.
दरम्यान, आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी राम मंदिराच्या संबंधित जमिनी खरेदीतही मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी यासंदर्भातील काही कागदपत्रे आज एसआयटीकडं सोपवली आहेत. यामध्ये एकूम १३ जमिनीची कागदपत्रे आहेत. यांपैकी २ भूखंड असे आहेत ज्याचं प्रकरण परस्पर जोडलेलं आहे. संजय सिंह यांनी आरोप केला आहे की, ट्रस्टनं जमीन खरेदीत भेदभाव केला आहे. त्यांच्या माहितीनुसार, जे भूखंड राम मंदिराच्या अगदी जवळ होते ते भूखंड स्वस्तत खरेदी करण्यात आले तर जे भूखंड मंदिरापासून लांब अंतरावर आहेत ते जास्त किंमतीत खरेदी करण्यात आले आहेत. यामध्ये लांब असलेले भूखंड हे ट्रस्टमधील लोकांच्या जवळच्या नातेवाईकांच्या आहेत. अशा प्रकारे ट्रस्टच्या नातेवाईकांना त्यांच्या जमिनीच्या बाजारभावापेक्षा अधिक मोबदला देऊन त्यांना फायदा देण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.