

Ravindra Chavan News : कल्याण ग्रामीण विधानसभेतील श्री पिंपळेश्वर देवस्थान मंदिरासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या २६ मे २०२६ रोजी झालेल्या बैठकीत मंदिर ट्रस्टला तब्बल ४ एकर २५ गुंठे जमीन नाममात्र दरात देण्याचा तसेच सध्या वापरात असलेल्या जमिनीचे नियमितीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता.
मंदिराच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सन्मान सोमवारी करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमात चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटाची चर्चा ठाण्याच्या राजकारणात आहे.
कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेण्याच्याआधी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कानात सांगून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला होता. पण सामंत यांनी मंदिराच्या बाजूने ठामपणे निर्णय घेतल्याचा गौप्यस्फोट रवींद्र चव्हाण यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये केलेल्या या वक्तव्यामुळे सामंत यांच्यावर कोणी दबाव टाकला, अशी चर्चा ठाण्याच्या राजकारणात सुरू आहे. कारण जेव्हा रवींद्र चव्हाण बोलले त्यावेळी व्यासपीठावर असलेल्या सामंत यांनी मान हालवत त्याला दुजोरा देत स्मितहास्य देखील केले.
सामंत यांच्यावर दबाव आणणारा वरिष्ठ नेता हा ठाण्यातील असल्याचे चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. दरम्यान,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जागेसाठी रवींद्र चव्हाण हे मंत्री असताना त्यांनी पाठपुरवा केल्याचे म्हटले.
कल्याण-डोंबिवलीतील वाढती लोकसंख्या, दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या कृतज्ञता सोहळ्यात त्यांनी ही मागणी करत भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा रोडमॅपच मांडला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.